शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

गॅसजोडणी तपासणी नावाखाली लूट

By admin | Updated: January 20, 2017 23:22 IST

शिवसेनेचा विरोध : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना ग्राहकांचे निवेदन

सिडको : एलपीजी गॅसजोडणीच्या तपासणीच्या नावाखाली भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या वितरकांमार्फत ग्राहकांची होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.  भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या वितरकांमार्फत गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस ग्राहकांना मोबाइलवर मॅसेज पाठवित आहे. भारत पेट्रोलियमच्या आदेशानुसार गॅसजोडणी तपासणी अनिवार्य आहे. लवकरच आमचा मेकॅनिक तपासणीसाठी येईल. त्याचे ओळखपत्र तपासून तपासणीकामी सहकार्य करून त्यांना तपासणीचे शुल्क देऊन पावती घ्यावी, अशा आशयाचे मॅसेज पाठवून प्रत्येक गॅसजोडणीमागे ग्राहकांची आर्थिक लूटमार करून जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवित आहे. शिवाय दुरुस्ती, स्पेअरपार्टच्या नावाखाली आणखी आर्थिक भुर्दंड देण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. आधीच नोटाबंदी, इंधन दरवाढ, दूध दर वाढीने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला लुटण्याचा हा नवीन प्रकार त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी प्रवीण तिदमे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुळात, अशा प्रकारची तपासणी करणे ही पुरवठादार कंपनीचीच जबाबदारी आहे. त्याचा भुर्दंड जनतेच्या माथी टाकणे योग्य नाही. सुरक्षेसाठी तपासणी अनिवार्य जरूर असावी. परंतु, त्याचा आर्थिक भार कंपनीने उचलावा, अशी मागणीही तिदमे यांनी केली आहे. निवेदनाप्रसंगी देण्यासाठी महेश ढोरे, श्रेयस घुले, हेमंत कोठारी, सुनील पवार, जुनेद खतीब आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)