शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी

By admin | Updated: August 2, 2014 01:23 IST

केंद्रीय मंत्रालयाला अवगत : पाऊस थांबल्यास कार्यवाही

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात रस्ता खचल्याची बाब केंद्रीय भूपृष्ट मंत्रालयाने गांभीर्याने घेतली असून, शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी व रस्त्याचे काम करणाऱ्या गॅमन इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्याठिकाणी डोंगरावरून कोसळणारा धबधबा आहे. त्याचे पाणी जमिनीखाली शिरून रस्ता खचल्याचा निष्कर्ष या अधिकाऱ्यांनी काढला आहे. दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे सततच्या पावसामुळे याच मार्गावर रस्ता खचला होता. त्यानंतर त्याची डागडुजी करण्यात आल्याने आता तो भाग व्यवस्थित असल्याची पुष्टीही या अधिकाऱ्यांनी जोडली. कसारा घाटात गुरुवारी दुपारी रस्ता खचल्याची बाब वाहनचालकांच्या निदर्शनास आल्याने हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन एका बाजूची वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्णातील माळीण येथे अशाच प्रकारे डोंगर खचून संपूर्ण गावच्या गाव नष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वर्दळीच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्ग खचण्याच्या प्रकाराने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाशी संपर्क साधून संचालक तावडे यांना त्याबाबतची माहिती दिली व केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी सूचना केली असता, तावडे यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महामार्गाची पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता खोडस्कर, गॅमन इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहन आदिंनी महामार्गाला भेट देऊन पाहणी केली. कसारा घाटात अजूनही पाऊस सुरू असल्याने खचलेल्या रस्त्याची डागडुजी तातडीने करणे शक्य नाही; परंतु पाऊस थांबल्यानंतर त्यातील भेगा भरून रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. कसारा घाटात चार ते पाच ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या स्वरूपात धबधबे असून, त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्रोत असल्याने त्याचा परिणाम रस्त्यावर होऊ शकतो, असा निष्कर्ष या अधिकाऱ्यांनी काढला आहे.