गडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले..

By Admin | Updated: April 8, 2017 23:00 IST2017-04-08T22:59:22+5:302017-04-08T23:00:05+5:30

ब्राह्मणगाव : चैत्र पोर्णिमेनिमित्त खान्देशचे कुलदैवत श्री सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची उन्हातही गर्दी दोन दिवसांपासून वाढली आहे

Road to the fort rises with the crowd of devotees. | गडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले..

गडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले..

ब्राह्मणगाव : चैत्र पोर्णिमेनिमित्त खान्देशचे कुलदैवत श्री सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची कडक उन्हातही गर्दी दोन दिवसांपासून वाढली आहे. दरवर्षी जळगाव, धुळे, नंदुरबार, मध्य प्रदेशच्या खेतियापासून देवीचे भाविक मोठ्या संख्येने पायी जातात. यावर्षी तर उन्हाची तीव्रता खूपच वाढली आहे, मात्र भाविकांची आपल्या कुलदेवते प्रति आस्था दृढ असून, न थकता भाविक मोठ्या संख्येने पायी जात आहेत. सटाणा-मालेगाव रस्त्यावर ब्राह्मणगावपर्यंत रस्त्याने जाणाऱ्या पायी भाविकांसाठी अवजड वाहनांमुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत होती, तेव्हा सटाण्याकडून येणारी अवजड वाहनांची वाहतूक फिरवण्यात आली. भाविकांसाठी ठिकठिकाणी मोफत नाश्ता, जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Road to the fort rises with the crowd of devotees.