शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी चेंबर्स झाकून रस्ते झाले चकाचक

By admin | Updated: May 23, 2014 01:07 IST

लोकमत विशेष

लोकमत विशेष डांबरीकरण जोरात : कुठे बुजले तर कुठे ठरताहेत धोकेदायकनाशिक : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांनी शहरात वेग घेतला असून, शहरातील मुख्य रस्त्यासह उपनगरीय रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र डांबरीकरण करीत असतानाच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी जे भुयारी गटारींचे ढापे आहेत त्यांची छिदे्रच बुजली गेल्याने पाणी तुंबण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी हे ढापे डांबरीकरणाच्या पातळीच्या खाली गेल्याने वाहनधारकांसाठी धोक्याचे नाही तर जीवघेणे ठरत आहेत. नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे आचारसंहितेत अडकल्याने सुमारे दोन-अडीच महिने कोणतीही कामे होऊ शकली नाहीत. जी कामे मंजूर होती तीही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिरंगाईने व संथगतीने सुरू झाली. निवडणूक निकाल जाहीर होताच कामांना वेग आला असून, यात डांबरीकरणाची कामे प्रामुख्याने होताना दिसत आहेत. डांबरीकरणाने रस्ते चकाचकआचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरातील विकासकामे ठप्प झाली होती. निवडणुकीनंतर रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांनी वेग घेतला आहे. शहरातील त्र्यंबक नाका ते मायको सर्कल, शरणपूर पोलीस चौकी ते एबीबी सर्कल, सीबीएस ते टिळकपथ, टिळकपथ ते कॅनडा कॉर्नर या मुख्य रस्त्यांसह उपनगरीय परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे सदरचे रस्ते चकाकले असले तरी या रस्त्यांदरम्यान येणार्‍या पावसाळी भुयारी गटारींचे ढापे बुजले गेले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये रस्त्यावरचे पाणी जाण्यास मार्ग राहिलेला नसल्याने पाण्याची तळी साचण्याचीच अधिक शक्यता आहे. चेंबरचे ढापे बुजलेरस्त्यांचे डांबरीकरण करीत असताना मूळ रस्त्यावर डांबरच्या थरावर जाड खडीचा, त्यावर बारीक खडीचा थर टाकला जातो. त्यावर डांबर नसलेल्या बारीक खडीचा थर मारला जातो. त्यामुळे मूळ रस्त्यापासून किमान तीन ते चार इंच उंचीचा नवीन रस्ता तयार होतो. त्यामुळे या रस्त्यादरम्यान पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेले भुयारी गटारीचे चेंबर्स असतात ते रस्ता करताना बुजले गेले आहेत. या चेंबर्सला पाणी जाण्यासाठी जाळ्यांचे ढापे असतात. त्यावरच डांबरीकरण झाल्याने जाळ्या बुजल्या गेल्या आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाणी जाण्यासाठीच जागा नसल्याने पाण्याची तळी साचली जातील. असा प्रकार सीबीएस सिग्नल ते टिळकपथ आणि टिळकपथ ते कॅनडा कॉर्नर दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करताना ढापेच बुजले गेले आहेत. याठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत असते. ते अधिक साचून धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी याचठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते, तर सुयोजित संकुलच्या तळमजल्यातील दुकानांमध्ये पाणी शिरले होते.कुठे ढापे बनले धोकादायकअनेक ठिकाणी डांबरीकरण करताना रस्त्यांमध्येच आलेल्या भुयारी गटारींचे चेंबर्स बुजविण्यात आले नसल्याने त्याठिकाणी खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाचालकाला रस्त्याच्या मधोमध असलेला हा खड्डा झटकन लक्षात येत नाही आणि चेंबरचा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. कॅनडा कॉर्नरकडून शरणपूर पोलीस चौकीकडे येणार्‍या रस्त्याच्या मधोमधच किमान तीन ते चार चेंबर्सचे खड्डे तयार झाले आहेत. रस्ता करताना सदरचे ढापे उचकवून ते रस्त्याच्या समांतर आणणे गरजेचे असताना तसे न करताच काम करण्यात आले आहे. ----- जोड -----------