दंगलीत जात-धर्म नव्हे तर माणूस मरतो : वाटपाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:23 IST2018-05-15T01:23:11+5:302018-05-15T01:23:11+5:30

स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन केली त्यामुळे स्वराज्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. जाती-धर्मावरून दंगली पेटविणे हे स्वराज्यात कधीही घडले नाही; मात्र दुर्दैवाने आज आपल्यासमोर घडत आहे. दंगलींमध्ये कोणताही धर्म किंवा जात मरत नाही तर केवळ माणूस मरतो, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? असा सवाल प्रा. सोपान वाटपाडे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून उपस्थित केला.

 Riot is not a religion, but a person dies: religion | दंगलीत जात-धर्म नव्हे तर माणूस मरतो : वाटपाडे

दंगलीत जात-धर्म नव्हे तर माणूस मरतो : वाटपाडे

नाशिक : स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन केली त्यामुळे स्वराज्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. जाती-धर्मावरून दंगली पेटविणे हे स्वराज्यात कधीही घडले नाही; मात्र दुर्दैवाने आज आपल्यासमोर घडत आहे. दंगलींमध्ये कोणताही धर्म किंवा जात मरत नाही तर केवळ माणूस मरतो, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? असा सवाल प्रा. सोपान वाटपाडे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून उपस्थित केला.  यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.१४) वाटपाडे यांनी चौदावे पुष्प गुंफले. ‘शिवचरित्र- आधुनिक समस्यांवर शिवचरित्रातून उपाय’ या विषयावर वाटपाडे यांनी उपस्थितांना छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार व संभाजी राजे भोसले यांचा त्याग व समर्पण याविषयी प्रबोधन केले. यावेळी ते म्हणाले, छत्रपतींनी सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभारले हे विसरून चालणार नाही. आज शिवचरित्र व शिवजयंती मनोरंजन आणि धिंगाण्यापलीकडे जात नाही, हे दुर्दैवाने सांगावे लागत असल्याची खंतही वाटपाडे यांनी बोलताना व्यक्त केली.
...तर जिजाऊ जन्माला यायला हव्या
शिवबा जन्माला यावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र त्यासाठी आई जिजाऊ जन्माला यायला हव्या; मात्र आजची सुशिक्षित पिढी विज्ञान व तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत गर्भलिंगनिदान चाचण्यांच्या माध्यमातून गर्भातच स्त्रीभ्रूण हत्येचे पाप करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समाजात जर जिजाऊ जन्माला आल्या नाही तर शिवबा जन्माला कसा येईल? असा प्रश्न वाटपाडे यांनी बोलताना उपस्थित केला. आजचे व्याख्यान  विषय : माध्यमांचे स्वातंत्र्य व लोकशाहीचा जिवंतपणा ,  व्याख्याता : अ‍ॅड. असीम सरोदे

Web Title:  Riot is not a religion, but a person dies: religion

टॅग्स :Nashikनाशिक