शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्देमाल मूळ मालकांना परत

By admin | Updated: October 23, 2016 00:02 IST

मुद्देमाल मूळ मालकांना परत

नाशिक : कायदा व सुव्यवस्थेसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या पोलिसांवर आरोप-प्रत्यारोप झाले तरी ते कर्तव्यात कसूर करीत नाहीत़ नागरिक व पोलिसांमधील दरी कमी व्हावी यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आहे़ या घटकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंघल यांनी केले़ पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल परत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते़पोलीस मुख्यालयातील ग्रीन बॅरेकमध्ये आयोजित कार्यक्रमात आयुक्त सिंघल यांच्या हस्ते सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना (फिर्यादींना) परत करण्यात आला़ यामध्ये सोने, चांदीच्या ऐवजासह दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने तसेच गृहोपयोगी वस्तूंचा समावेश होता़ पोलीस आयुक्तालयात झालेल्या घरफोडी, चेनस्नॅचिंग, चोरी, जबरी लूट अशा विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या मुद्देमालाचा यामध्ये समावेश होता़ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेला हा मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने परत करण्यात आला़आयुक्तांच्या हस्ते फिर्यादी स्नेहल लाखलगावकर, प्रकाश सोनवणे, लता शिंदे, सुनंदा काळे, सोनल कलंत्री, सुरेखा जोशी, अलका बेलगावकर, शांताराम घरटे, राकेशकुमार शर्मा, मंगला गवांदे, सुवर्णा जाधव, अशोक कुलकर्णी, कमल फुलफेअर, कैलास दाभाडे, शेखर पवार, संतोष माळी, विष्णू भागवत, प्रल्हाद तोरणे, अजितसिंह राऊत, सोमनाथ शिंदे, पुंडलिक दळवी, उदय साळुंखे, इमा मोद्दीवली मोहमद अन्सारी, मिलिंद मेंदळे, प्रशांत जहागीरदार, भास्कर अहिरे आदिंना मुद्देमाल परत केला़यावेळी व्यासपीठावर पोलीस उपआयुक्त विजय पाटील, दत्तात्रय कराळे, श्रीकांत धिवरे, अतुल झेंडे, विजयकुमार चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक उपस्थित होते. आभार सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी मानले. (प्रतिनिधी)