परतीच्या पावसाची शहरात हजेरी

By Admin | Updated: September 26, 2014 00:33 IST2014-09-26T00:32:55+5:302014-09-26T00:33:13+5:30

आदिशक्तीवर जलाभिषेक : उत्तरा नक्षत्राचे अखेरचे चरण

Return to the city of returning rain | परतीच्या पावसाची शहरात हजेरी

परतीच्या पावसाची शहरात हजेरी

नाशिक : शहर व परिसरात घरोघरी घटस्थापना होत आदिशक्तीच्या पूजापाठमध्ये नाशिककर व्यस्त असतानाच, सायंकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावत आदिशक्तीवर जलाभिषेक केला. उत्तरा नक्षत्राच्या अंतिम चरणात नवरात्रीच्या पहिल्याच माळेला पावसाने हजेरी लावल्याने सायंकाळी खरेदीदार व विक्रेत्यांची एकच धांदल उडाली. जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आतापर्यंत ८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
उत्तरा नक्षत्राची सुरुवातीची तीनही चरणे कोरडी गेल्यानंतर वरुणराजाने आज सायंकाळी अचानक हजेरी लावली. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या खरेदीत गुंतलेल्या नाशिककरांची धावपळ उडाली. आज सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली होती. याशिवाय सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिटचाही तडाखा नाशिककरांचा घाम काढत होता. त्यामुळे पावसाची शक्यता होतीच. सायंकाळी अचानक अंधारून आल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. घटस्थापनेला पहिल्याच माळेला नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पावसामुळे भाविकांचीही तारांबळ उडाली.
शहर व परिसरात आतापर्यंत पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९३ टक्के भरलेले आहे, तर काश्यपी ८२ टक्के, गौतमी गोदावरी ९७ टक्के, तर दारणा धरण ९९ टक्के भरले आहे. जिल्ह्यातही आतापर्यंत ८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी सप्टेंबरअखेर १०४ टक्के पाऊस नोंदविला गेला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Return to the city of returning rain