शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटल्याचा परिणाम सभापती निवडीवर

By admin | Updated: September 26, 2014 00:22 IST

युती तुटल्याचा परिणाम सभापती निवडीवर

नाशिक : राज्यातील शिवसेना-भाजपा युती तुटल्यामुळे त्याचा थेट परिणाम येत्या ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडणुकीवर होणार असून, राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष साथ देणारी शिवसेना प्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या अथवा कॉँग्रेसच्या सोबत जाऊ शकते.विशेष म्हणजे, संख्याबळ चारवरून पाचवर गेलेल्या भाजपाचा मात्र दुर्दैवाने या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांना विरोधातच बसावे लागण्याची शक्यता आहे. नुकत्याच २१ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपाचे सदस्य निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी झालेले नव्हते; मात्र शिवसेनेने तटस्थ राहून कॉँग्रेसची गोची करीत राष्ट्रवादीला मदतच केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती. आता येत्या ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विषय समिती सभापती निवडणुकीत चार सभापतिपदांसाठंी निवडणूक होणार असून, राष्ट्रवादीचे सर्वाधिक २७ व तीन अपक्ष धरून ३० संख्याबळ असून, त्यांना शिवसेनेने साथ दिल्यास शिवसेनेचे २० सदस्य मिळून शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आल्यास चक्क ५० चा बहुमताचा आकडा हे दोन्ही पक्ष गाठू शकतात. याउलट शिवसेना-भाजपा एकत्र येऊन त्यांना कॉँग्रेसने साथ दिल्यास हाच आकडा ३९ च्या घरात म्हणजेच बहुमताच्या घरात जाऊ शकतो. शिवसेनेचे २०, भाजपाचे पाच व कॉँग्रेसचे १४ सदस्य आहेत. त्यामुळे आगामी विषय समिती सभापतिपदांची निवडणूक युतीचा काडीमोड झाल्याने चांगलीच रंगात येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी आपापल्या परीने हालचाली सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)