शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सभेत ठराव : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST

शासकीय शेजारी खासगी शाळा नको

दुसऱ्या छायाचित्रात सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करताना केरू पवार, डॉ. प्रशांत सोनवणे, शैलेश सूर्यवंशी, प्रवीण गायकवाड आदि.नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होऊ नये व शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांशेजारी खासगी शाळांना मान्यता देण्यात येऊ नये, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तसेच बागलाण गटशिक्षण अधिकाऱ्यांवर गैरवर्तनाचे आरोप करण्यात आल्याने त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश अध्यक्ष जयश्री पवार यांनी प्रशासनाला दिले.सभेच्या सुरुवातीलाच दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रकाश वडजे, प्रवीण जाधव व सुजाता वाजे यांनी जिल्हा परिषदेचा सेस निधी सदस्यांच्या सूचनेनुसारच खर्च करण्यासाठी लेखाशीर्ष बदलण्याची मागणी केली. त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी रा. सो. महाले यांनी शासनानेच भांडवली व महसुली खर्च करताना काही बाबींचे पालन करण्याच्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्याचे सांगितले. सदस्यांनी सूचित केल्याप्रमाणेच कामे करण्यात यावीत, असा ठराव संमत करण्यात येऊन तो शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजकल्याण विभागाच्या झेरॉक्स वितरणासाठी लाभार्थींची नावे दोन दिवसांत समाजकल्याण विभागाकडे कळवावीत, असे आवाहन केले. शैलेश सूर्यवंशी यांनी असे अडीच वर्षांत पहिल्यांदाच घडत असल्याचा टोमणा मारला. भास्कर गावित यांनी कोहोर गटात मानसेवी डॉक्टर येत नसल्याबाबत तक्रार केली, तर नांदगाव पंचायत समिती सभापती विलास अहेर यांनी नांदगाव तालुक्यातील चौथीच्या विद्यार्थिनींना पोषण आहार वितरित न करता तो परस्पर बाजारात विकण्यात आल्याचा आरोप करीत याबाबत दोषींवर कारवाईची मागणी केली. उपमुख्य कार्यकारी उद्धव खंदारे यांनी याबाबत गर्गे यांच्यामार्फत चौकशी सुरू असल्याचे सांगितले. अध्यक्ष जयश्री पवार यांनी, तीन दिवसांत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना दिल्या. सोनाली पवार यांनी, पाटोदा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेशेजारीच खासगी शाळा सुरू कशी झाली, प्रत्यक्षात महाविद्यालयाला परवानगी असताना पहिलीचे वर्ग कसे सुरू झाले, अशी विचारणा प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांच्याकडे केली. नितीन पवार यांनी कळवण तालुक्यात मळगावला असाच प्रकार घडल्याचे सांगितले. त्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेशेजारी स्वंयअर्थसहायित शाळांना थेट परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव प्रशांत देवरे यांनी मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी ४५ दिवसांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यानुसार जिल्ह्णातील २२ शाळा अ वर्गात असल्याचे सांगितले. तसेच ब, क व ड संवर्गातील शाळा ब व अ वर्गात आणण्यासाठी विद्यार्थ्यांची उजळणी व चाचणी करण्यात येणार असून, शिक्षकांनाही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळेशेजारी तसेच शासन निर्णयाविरोधात शाळा सुरू करणाऱ्या ६९ खासगी शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सुखदेव बनकर यांनी दिली. भूजल सर्वेक्षण विभागाकडील कार्यरत २४ कर्मचाऱ्यांना तसेच देवळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, अशी सूचना रवींद्र देवरे व केदा अहेर यांनी मांडली. त्यावर हा बोजा जिल्हा परिषदेच्या सेसवर पडेल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी सांगितले. मात्र या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. सर्वसाधारण सभेत एकूण ४० विषयांपैकी ३९ विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)