शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रहिवाशांचा स्थलांतरास नकार

By admin | Updated: August 2, 2014 01:22 IST

काझी गढी : अधिकाऱ्यांची मिनतवारी वाया

नाशिक : काझीची गढी ढासळत असल्याने येथील रहिवाशांचे स्थलांतर करण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर येथील रहिवाशांनी नकार दिला. त्यांना राजी करण्याकरिता अधिकाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले; परंतु उपयोग झाला नाही.काझीची गढी ही अनेक वर्षांपासून धोकादायक आहे. परंतु गेल्या नोव्हेंबरपासून ही गढी खचण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गढीला संरक्षक भिंत बांधण्याचा पर्याय पुढे करण्यात आला होता. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. परंतु गेल्या सोमवारपासून शहरात पावसाने जोर धरल्याने गढीचा काही भाग खचला आहे. अनेक रिकामी घरे त्याबरोबर कोसळली. महापालिकेने दक्षता घेतल्याने जीवितहानी झाली नाही. तथापि, गढी अधिक प्रमाणात खचली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु रहिवासी जागा सोडण्यास तयार नाहीत. गुरुवारी पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ तसेच स्थानिक नगरसेवकांनी मध्यस्थी केली आणि रहिवाशांना काझीची गढी येथे स्थलांतरित होण्यास राजी केले. गाडगे महाराज धर्मशाळेत स्थलांतर करण्यासाठी धर्मशाळेचे भाडे शासन किंवा महापालिका भरेल असे सांगण्यात आले. त्यामुळे स्थलांतरास येथील रहिवासी तयार झाले. शनिवारपासून हे रहिवासी स्थलांतरित होणार होते; परंतु आज त्यांनी नकार दिला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा पुनर्वसन अधिकारी मधुमती सरदेसाई यांनी रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. (प्रतिनिधी)