अभोणा येथे रेझिंग डे

By Admin | Updated: January 3, 2017 23:14 IST2017-01-03T23:14:23+5:302017-01-03T23:14:46+5:30

अभोणा येथे रेझिंग डे

Resh day in abhona | अभोणा येथे रेझिंग डे

अभोणा येथे रेझिंग डे

अभोणा : समाजात घडणाऱ्या दुर्घटना सामान्य नागरिक रोखू शकतो, असे प्रतिपादन अभोणा पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहुल फुला यांनी केले.  येथील डांग सेवा मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रेझिंग डेनिमित्त मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कायद्याचे ज्ञान असलेले गुन्हगार नागरिकांना त्रास देत असतात. पोलीस हे आपले मित्रच आहेत. कुठलेही दडपण न ठेवता आपल्या तक्रारी त्यांच्याकडे मांडल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य रमेश चौधरी यांनी प्रास्ताविक, तर किरण सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.  यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व शस्त्रांची, विविध कार्यप्रणालीची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. यावेळी उपप्राचार्य कुलकर्णी अभोणाचे पोलीस अहिरे, आवारी, चौधरी आदिंसह कर्मचारी, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)




 

Web Title: Resh day in abhona