शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य टिळकांचे स्मरण

By admin | Updated: September 13, 2016 00:48 IST

नामपूर : गावातून १९०४ साली काढण्यात आली होती सवाद्य मिरवणूक

 नामपूर : समाजमनात व सर्व समाजात प्रेमभाव निर्माण व्हावा, एकजिनसीपणा यावा या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. सध्या मात्र अनेक ठिकाणी हा भाव कोठेही दिसत नसला तरी नामपूर येथील आनंद गणेश मंडळाचे युवक विविध उपक्रमांतून लोकमान्यांचा वारसा जपताना दिसत आहेत.
नाशिकचे लखन सावंत, अनिल सावंत, अक्षय सावंत हे दरवर्षी गणेशोत्सवासाठी नामपूरला येतात. सोबत व्यावसायिक जयेश सावंत, राकेश सावंत, निखिल पवार व राकेश पाटील हे सुद्धा असतात. पर्यावरणाचा विचार करता मूर्तीचे विसर्जन न करणे, वाद-विवाद टाळण्यासाठी विसर्जन मिरवणूक वेगळ्या पद्धतीने काढणे. सर्वांच्या मनांची गुंफण होण्यासाठी स्टेज उभारणीपासून बांधणीपर्यंत मंडळाचे युवक श्रमदान करताना एकत्र येतात.
टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवास १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रकार नयन नगरकर यांनी रेखाचित्रातून टिळकांचा जीवनप्रवास उलगडला आहे. यात मंडालेच्या तुरुंगातील टिळक व त्यांच्याकडून साकार झालेला गीतारहस्य ग्रंथ, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या घोषणेपासून तर लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आदि घटनांना नगरकरांनी चित्रांकित केले आहे. आनंद गणेश मंडळाचे हे ४३ वे वर्ष आहे. विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा मंडळाचा उद्देश आहे. साक्षरता, व्यसनमुक्ती, लेक वाचवा- लेक शिकवा यासंदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘अंध डोळस हसरा कळस’ हा कवी जगदीश देवपूरकरांचा व अंध कलावंत प्रवीण पाटील यांचा कार्यक्रम समाजप्रबोधनाचे माध्यम ठरले. मंडळाच्य युवकांना प्रेरणा देण्यासाठी मंडळाचे जुने जाणते कवीवर्य कमलाकर देसले, तुळजाई मंडळाचे जगदीश सावंत व सुरेंद्र वाघ प्रयत्नशील आहेत. यांच्या मार्गदर्शनातून मंडळाची वाटचाल सुरू आहे. (वार्ताहर)