राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान

By Admin | Updated: August 22, 2014 00:34 IST2014-08-21T22:38:12+5:302014-08-22T00:34:52+5:30

नाशिक विभागात करंजगाव प्रथम

Rashtrasant Tukdoji Maharaj Clean Village Campaign | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान

नाशिक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान पुरस्काराचा निकाल विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जाहीर केला असून, त्यात विभागातून निफाड तालुक्यातील करंजगाव प्रथम, धुळे जिल्ह्यातून नेवाडे ग्रामपंचायत द्वितीय, तर नाशिक तालुक्यातून सिद्धपिंप्री व संगमनेर तालुक्यातून निमज या ग्रामपंचायतींना विभागून तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
आयुक्त एकनाथ डवले यांनी नुकतीच या ग्रामपंचायतींची पाहणी केली होती. त्यानंतर हा निकाल घोषित केला आहे. विभागातून प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीला दहा लाख, तर द्वितीय आणि तृतीय ग्रामपंचायतींना अनुक्रमे आठ व सहा लाखांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यातही निमज व सिद्धपिंप्री ग्रामपंचायतींना सहा लाखांचे पारितोषिक विभागून असल्याने प्रत्येकी तीन लाखांची रक्कम मिळणार आहे. (पान ७ वर)

त्याचप्रमाणे विशेष पुरस्कारांच्या यादीतही करंजगाव व सिद्धपिंप्रीचा नंबर लागला आहे. पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापनासाठी दिला जाणारा स्व. वसंतराव नाईक विशेष स्मृती पुरस्कार नेवाडे (शिंदखेडा, धुळे) या ग्रामपंचायतीला, तर कुटुंबकल्याण कार्यक्रमासाठी दिला जाणारा स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार पिंपळी (प्र.) (ता. अंमळनेर) ग्रामपंचायतीस, तर पन्नास हजार रुपयांचा सामाजिक एकतेसाठी दिला जाणारा बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार सिद्धपिंप्री ग्रामपंचायतीस जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रकमेचा साने गुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळेचा पुरस्कार नरवेल (ता. मुक्ताईनगर, जळगाव) ग्रामपंचायतीस, तर सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी पुरस्कार करंजगाव ग्रामपंचायतीस जाहीर करण्यात आला आहे, तर दहा लाखांचा शाहू-फुले-आंबेडकर स्वच्छ दलितवस्ती विकास व सुधारणा पारितोषिक विभागून फुलगाव (भुसावळ, जळगाव) व निमगाव गांगडा (कर्जत, अहमदनगर) या ग्रामपंचायतींना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Rashtrasant Tukdoji Maharaj Clean Village Campaign