शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

स्थलांतरीत पाहुण्यांचे होतेय वेगाने आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:22 PM

नाशिक : थंडीचे आगमन उशिराने झाल्यामुळे आणि नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातील पाणीसाठ्याची पातळी वाढती असल्याने हिवाळ्याच्या हंगामात येथील वन्यजीव अभयारण्यात जलाशयावर ...

ठळक मुद्देनांदुरमधमेश्वर : मासिकगणनेत ३२ हजार पक्ष्यांची मोजदाद

नाशिक : थंडीचे आगमन उशिराने झाल्यामुळे आणि नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातील पाणीसाठ्याची पातळी वाढती असल्याने हिवाळ्याच्या हंगामात येथील वन्यजीव अभयारण्यात जलाशयावर दाखल होणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण नोव्हेंबरपर्यंत कमी होते; मात्र डिसेंबरअखेरीस स्थलांतरीत ह्यपाहुणेह्ण दाखल होण्याचा वेग वाढला आहे. डिसेंबरच्या मासिक पक्षी गणनेत सुमारे एकूण ३२ हजार पक्ष्यांची मोजणी करण्यात आली.रामसर दर्जा मिळालेल्या नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात परदेशी पक्ष्यांचे आगमन होऊ लागल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पांढरा करकोचा, डोमिसाइल क्रेन, फ्लेमिंगो या पाहुण्यांच्या आगमनाची अद्याप पक्षीप्रेमींना प्रतीक्षा कायम आहे. बुधवारी (दि.३०) अभयारण्यातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव अशा ७ ठिकाणी नाशिक वन्यजीव विभागाच्या नांदुरमधमेश्वरचे सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल काळे यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गाइड, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या पक्षी निरीक्षकांनी पक्ष्यांची गणना केली. पक्षी निरीक्षण प्रगणनेत विविध पाणपक्षी व झाडांवरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या. एकूण ६६ प्रजातींचे २७ हजार ४४ पाणपक्षी, झाडांवरील ४ हजार ८५८ पक्षी व गवताळ भागातील काही पक्षी अशा एकूण ३१ हजार ९०२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सकाळी सात ते साडेदहा आणि सायंकाळी तीन ते पाच या वेळेत गणना पूर्ण करण्यात आली.---इन्फो--वाढत्या थंडीसोबत चित्रबलाकची संख्या वाढलीडिसेंबर महिन्यात थंडीत झालेल्या वाढमुळे अभयारण्यात चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) व वारकरी पक्ष्याची संख्याही वाढली आहे. यासोबतच मार्श हॅरियर, ऑस्प्रेसारख्या शिकारी पक्ष्यांसह उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, गढवाल, स्पुनबिल, कमळपक्षी, शेकाट्या, नदीसुरय यांसह आदी गवताळ भागात आढळणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाटदेखील आता वाढला आहे.--फोटो आर वर ३१नांदूर१/२/३ नावाने सेव्ह आहेत.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वर