कंधाणेत रामलीला उत्सवास प्रारंभ

By Admin | Updated: April 8, 2017 23:03 IST2017-04-08T23:03:08+5:302017-04-08T23:03:25+5:30

कंधाणे : येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित्त रामलीला उत्सवास प्रारंभ झाला आहे.

Ramlila festival begins in Sindhana | कंधाणेत रामलीला उत्सवास प्रारंभ

कंधाणेत रामलीला उत्सवास प्रारंभ

 कंधाणे : येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित्त रामलीला उत्सवास प्रारंभ झाला असून, पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रामायणाचा सर्व सारांश नाटक रूपात सादर करण्यात येत असून, या रामलीला उत्सवाला यंदा ७० वर्षं पूर्तीनिमित्त ग्रामीण लोककलेचा एक अनोखा कला आविष्कार प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या रामलीलेत वाल्याचा वाल्मीकी बनलेल्यापासून तर रावण वधापर्यंतचा सर्व भाग नाटक रूपात सादर केला जातो. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
सन १९४७ साली कै. शंकर बैरागी यांच्या अथक परिश्रमाने रामलीला नाटकाचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला होता. रामनवमीच्या दिवशी रामलीला उत्सवाची विधिवत पेंढी उभारणी केली जाते, मग तिसऱ्या दिवशी सायंकाळी रामलीला नाटकाचा पहिला अंक सादर केला जातो.

Web Title: Ramlila festival begins in Sindhana