शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दोडी खुर्दच्या सरपंचपदी रमेश आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST

नांदूरशिंगोटे : दोडी खुर्दच्या सरपंचपदी रमेश खंडू आव्हाड तर उपसरपंचपदी जयश्री दिगंबर गोसावी यांची निवड झाली. सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ...

नांदूरशिंगोटे : दोडी खुर्दच्या सरपंचपदी रमेश खंडू आव्हाड तर उपसरपंचपदी जयश्री दिगंबर गोसावी यांची निवड झाली. सरपंच, उपसरपंच निवडीसाठी मंडळ अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. बी. शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी रमेश आव्हाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर उपसरपंच पदासाठी जयश्री गोसावी व सुनिता गोफणे यांनी अर्ज दाखल केला. उपसरपंच पदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. ९ सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला. गोसावी यांना सहा, तर गोफणे यांना केवळ तीन मते मिळाल्याने गोसावी यांची उपसरपंचपदी निवड झाली.

बैठकीस ग्रामपंचायत सदस्य विष्णू साबळे, नवनाथ माळी, संदीप आव्हाड, मनीषा सगळे, लता रूपवते, ज्योती आव्हाड उपस्थित होते. याप्रसंगी आबाजी आव्हाड, दामोधर कांगणे, एकनाथ कांगणे, संतू आव्हाड, गणपत आव्हाड, विजय आव्हाड, साहेबराव कांगणे आदींच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

-----------

दोडी खुर्दच्या सरपंचपदी रमेश खंडू आव्हाड तर उपसरपंचपदी जयश्री दिगंबर गोसावी यांची निवड झाल्यानतंर आनंदोत्सव साजरा करताना पदाधिकारी व कार्यकर्ते. (०४ दोडी खुर्द)

===Photopath===

040321\04nsk_21_04032021_13.jpg

===Caption===

०४ दोडी खूर्द