रंभाबाई काळेंचा विहिरीत सापडला होता मृतदेह, २६ दिवसांनी समोर आले हत्येचे कारण, आरोपी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:32 IST2026-03-23T17:31:18+5:302026-03-23T17:32:23+5:30

Nashik Crime News: रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेचा मृतदेह विहिरीत मिळाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोन गोष्टी समोर आल्या. त्या म्हणजे पैशाच्या वादातून ही हत्या केली गेली आणि दुसरे म्हणजे हत्या करणाऱ्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला.

Rambhabai Kale's body was found in a well, the reason for the murder came to light after 26 days, who is the accused? | रंभाबाई काळेंचा विहिरीत सापडला होता मृतदेह, २६ दिवसांनी समोर आले हत्येचे कारण, आरोपी कोण?

रंभाबाई काळेंचा विहिरीत सापडला होता मृतदेह, २६ दिवसांनी समोर आले हत्येचे कारण, आरोपी कोण?

Nashik Crime News: निफाड शहरातील २६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रंभाबाई आनंदा काळे यांच्या मृतदेहाचा शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीत रविवार (२२ मार्च) त्यांचा मृतदेह आढळून येताच एकच खळबळ उडाली आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीवरून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, संशयिताने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

रंभाबाई काळे (वय ६०) या निफाड येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. त्या २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी निफाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. 

पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत सीडीआर तपासण्यात आला. त्यातून एक संशयित मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. 

अरुणला चौकशीसाठी ताब्यात घेतले अन्...

पोलिसांनी निफाड येथील अरुण बाजीराव ढेपले (४५) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच ढेपलेने गुन्ह्याची कबुली दिली. दूध व्यवसाय करणाऱ्या ढेपलेची रंभाबाई यांच्याशी ओळख वाढली होती.मात्र, पैशांच्या व्यवहारातून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि या वादाच्या भरात ढेपलेने रंभाबाई यांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली दिली. 

दरम्यान, चौकशीनंतर ढेपलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस पथक आणि स्थानिक पोहणारे युवक शनिवारी रात्री दोन वाजल्यापासून शोधकार्य करत होते. 

अखेर रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश गुरव करत आहेत.

Web Title : रंभाबाई का शव कुएं में मिला; पैसे के विवाद में हुई हत्या।

Web Summary : 26 दिनों से लापता रंभाबाई काले नासिक के पास एक कुएं में मृत पाई गईं। पुलिस जांच में पता चला कि अरुण ढेपले के साथ पैसे के विवाद के कारण उसकी हत्या हुई। ढेपले ने कबूल किया और आत्महत्या का प्रयास किया।

Web Title : Rambhabai's body found in well; money dispute led to murder.

Web Summary : Rambhabai Kale, missing for 26 days, was found dead in a well near Nashik. Police investigation revealed a money dispute with Arun Dheple led to her murder. Dheple confessed and attempted suicide.