शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पुणेगाव-डोंगरगाव कालव्यासाठी रॅली

By admin | Updated: August 19, 2016 00:12 IST

पुणेगाव-डोंगरगाव कालव्यासाठी रॅली

येवला : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याचा उपक्रमयेवला : पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या तालुक्यातील बाळापुर पर्यत ४२ किमी आतर असलेला कालव्याची पूरपाण्याने चाचणी करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कालव्याची सद्यस्थिती पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी बाळापूर ते दरसवाडी धरणापर्यंत कालव्याच्या भरावावरु न दुचाकी रॅली काढली होती. या रॅलीत येवला व चांदवड येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.दरसवाडी धरण ते येवला तालुक्यातील बाळापूर कालवा सुस्थितीत असून कमी पाण्यामध्ये कालव्याची चाचणी सहज शक्य आहे. कालव्याच्या कडेने असलेल्या विहिरी, तळी, साठवण तलाव पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. कुठलाही वहनव्यय या चाचणीच्या वेळी होणार नसल्याने या कालव्याची चाचणी घ्यावी, अशी मागणी येवला तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांची व संघटनांची आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मोहन शेलार, जलअभ्यासक भागवत सोनवणे यांचेसह लाभक्षेत्रातील शेतकरी यांनी केली आहे. खडकओझर येथील केंद्राई बंधाऱ्यातुन सोडलेल्या पाण्यामुळे दरसवाडी बंधारा भरत आलेला आहे. दरसवाडी बंधाऱ्यामध्ये इतका मोठा पाणी साठा गेल्या कित्येक वर्षात प्रथमच होत आहे. गरज नसतांना केंद्राई धरणातुन निफाड तालुक्यात जाणारे पाणी दरसवाडी बंधाऱ्यात वळवणे गरजेचे आहे. आमदार डॉ. राहूल आहेर यांनी येवला तालुक्याकडे दुर्लक्ष करु नये व येवला तालुक्यातील किमान बाळापूर पर्यंत कालव्याच्या चाचणीसाठी आग्रह धरावा. या पाशर््वभूमीवर यंदाचा पावसाळा कालव्याच्या चाचणीसाठी अनुकूल असून कालव्याची घ्यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी भाजप- शिवसेना यांनीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. दुचाकी रॅलीमध्ये मोहन शेलार, भागवत सोनवणे, भगवान ठोंबरे, रवीराज जाधव, किरण ठाकरे, भागीनाथ कदम, प्रल्हाद शिंदे, समाधान शिंदे, नामदेव कदम, गोपीनाथ सोनवणे, कमलाकर कदम, सुभाष कदम, नारायण गुंजाळ, रमेश निकम, खंडू आहिरे, विठ्ठल कदम, रघुनाथ शिंदे, विशाल ढोमसे, जनार्दन चोळके, पुंडलिक कोटकर आदींसह येवला तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. रॅली कॅनॉलच्या कडेने जाताना चांदवड तालुक्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले. (वार्ताहर)