शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:16 IST

श्री गणरायाच्या स्थापनेनंतर सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाºया कुटुंबांच्या कामात अडथळा आला होता.

नाशिकरोड : श्री गणरायाच्या स्थापनेनंतर सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाºया कुटुंबांच्या कामात अडथळा आला होता. पोलीस प्रशासनाने लादलेल्या जाचक अटी, नियम यामुळे मंडळांना अगदी वेळेवर मंडपाचा आकार बदलण्याची, तर काही मंडळांना जागा बदलण्याची पाळी आली. दिवसेंदिवस कमी होत चाललेला सहभाग, वर्गणी, जाहिरातीची चणचण आदी कारणांमुळे मंडळांची संख्या घटत चालली आहे. अशा सर्व परिस्थितीवर मात करून गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांना गेल्या पाच-सहा दिवसांपासून दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे वैतागून सोडले होते. श्री गणरायाची स्थापना होऊन सोमवारी चौथा दिवस होता. मात्र सलग सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे भाविक घराबाहेर पडत नसल्याने मंडळाच्या देखाव्याकडे सामसूम पसरली आहे, तर अर्धवट देखावा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते व कारागिरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. थोडीशी विश्रांती घेत बरसणारा वरूणराजा यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.पोलिसांचा बंदोबस्त अपुराकाही मंडळांच्या ठिकाणी दिवसा, तर काही ठिकाणी रात्री असणारा पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा अद्याप बंदोबस्त लावलेला नाही. यामुळे मंडळाचे कार्यकर्ते व भाविक यांच्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसामुळे बंदोबस्ताचा ताण तूर्त सैल झाला असला तरी सर्व मंडळांजवळ बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली जात आहे.