शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

येवला शहरासह तालुक्यात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:45 IST

येवला : शहर व तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले होते. दुपारी ३  वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दीड तास  झोडपून काढले. त्यामुळे शहर परिसरातील सायगाव, एरंडगाव यासह अनेक गावांमध्ये नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. धुळगाव परिसरात पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला.  मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने नियमाने हजेरी लावली ...

येवला : शहर व तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले होते. दुपारी ३  वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दीड तास  झोडपून काढले. त्यामुळे शहर परिसरातील सायगाव, एरंडगाव यासह अनेक गावांमध्ये नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. धुळगाव परिसरात पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला.  मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने नियमाने हजेरी लावली आहे. गुरु वारपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरण होते. येवला परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, भरून वाहू लागले. शनिवारी वारा कमी असल्याने पावसाचा जोर होता. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.  असाच पाऊस पडला तर शेतकरी पेरण्या लवकर करतील, अशी अपेक्षा आहे. जोरदार वाऱ्याने शहरातील अनेक झाडांच्या फांद्या पडल्या. काही ठिकाणी फ्लेक्स उडाले.  धुळगाव : आठवडाभराची विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केलेल्या पावसाने बुधवार, गुरु वार व शुक्र वार या तब्बल तिन्ही दिवशी धुळगावसह पंचक्र ोशीतील गावांमध्ये जोरदार हजेरी लावली. मागील ४८ तासात निम्म्याहून अधिक बंधारे फुल्ल झाले आहेत. या पावसामुळे गावातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. काही घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. शुक्र वारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. पावसाने काहीशी विश्रांती घेतली की शेतकरी पेरणीला सुरु वात करतील.

टॅग्स :Rainपाऊस