शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची विश्रांती; विसर्गात कपात

By admin | Updated: August 5, 2016 01:51 IST

दिलासा : चोवीस तासांत ४७५ मि.मी. पाऊस

नाशिक : सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी तुरळक हजेरी लावून विश्रांती घेतल्यामुळे आकाश निरभ्र होऊन नाशिककरांना सूर्यदर्शनाने मोठा दिलासा मिळाला, तर दुसरीकडे धरणाच्या पाण्याच्या विसर्गातही कपात करण्यात आल्यामुळे गोदावरीचा पूर ओसरण्यास मदत झाली. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत नाशिक शहरात ५३ मिलिमीटर इतकाच पाऊस नोंदविला गेला, तर दिवसभर पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेत, सूर्यदर्शन दिल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या चार दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने सर्वत्र कोंदट वातावरण निर्माण झाले होते. पाऊस थांबल्यामुळे पुरामुळे नुकसान झालेल्या तसेच घरे, दुकानांमध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांना आवरासावर करण्यास मोठी मदत झाली. पूरपरिस्थितीमुळे दोन दिवस सुट्या मिळालेल्या शाळा, महाविद्यालये गुरुवारी पूर्ववत सुरू झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाने चांगलीच उघडीप दिली. चोवीस तासांत ४७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नदी, नाल्यांना आलेला पूरही ओसरला. पावसाने विश्रांती घेताच गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला. (प्रतिनिधी)