शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पावणेचार कोटींची उपकरणे खरेदी

By admin | Updated: September 11, 2016 01:38 IST

कृषी विभाग : सौर पथदीप, सौर पंप, सौर प्रकल्पांचा समावेश

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सुमारे पावणेचार कोटी रुपयांची सौर उपकरणांची खरेदी करण्यात येणार असून, जिल्हा नियोजन समितीमार्फत यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे कळते.अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रकमांच्या अनुदानावर सौर उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुख्य चौकात उभारण्यात येणाऱ्या सौर पथदीपांसाठी १० टक्के लोकवर्गणीची अट असते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्णातील ग्रामपंचायतींना अनुदानावर सौर पथदीप पुरविण्याची योजना असून, त्यासाठी १ कोटी ४४ लाखांचे सौर पथदीप ग्रामीण भागात पुरविण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना विद्युत सौर पंपाची आवश्यकता पाहून १ कोटी २८ लाखांचे सौर विद्युतपंप खरेदी करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे २ किलो वॅटच्या सौर विद्युत प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येणार असून ही सौर विद्युत प्रकल्पाचे साहित्य पुरविण्यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शहरातील शासकीय कन्या शाळेतही १० किलो वॅटचा सोलर पॉवर प्लॅन्ट सौर विद्युत प्रकल्प बसविण्यात येणार असून त्यासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. वरील चारही प्रकारच्या सौर उपकरणांसाठी ११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान कृषी विभागाकडून संबंधित सौर उपकरणाच्या कंपन्याकडून निविदा मागविण्यात येणार आहेत. मागील वर्षी सौर पथदीपांच्या निविदांमध्ये घोळ झाल्याने कृषी विभागाला दुबार निविदा काढण्याची वेळ आली होती. आधी जयपूरच्या (राजस्थान) कंपनीला सौर पथदीप पुरविण्याचा दिलेला ठेका वेळेत पूर्ण न झाल्याने दुसऱ्यांदा निविदा काढून नंतर गुजरातस्थित एका कंपनीला देण्यात आला होता. (प्रतिनिधी)