कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

By Admin | Updated: January 7, 2015 00:54 IST2015-01-07T00:53:40+5:302015-01-07T00:54:36+5:30

कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Publication of calendar of Agriculture, Animal Husbandry Department | कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या माहितीपूर्ण दिनदर्शिके चे आज प्रकाशन झाले़ जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे व उपस्थित सदस्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले़ या दिनदर्शिकेत पाठीमागील बाजूने जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे़ तसेच हे लाभ मिळविण्यासाठी करावयाच्या अर्जांची व कागदपत्रांची महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आल्याने या दिनदर्शिका चांगल्या मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत़ या तळागाळापर्यंत पोहचण्याची अपेक्षा अध्यक्ष चुंबळे यांनी व्यक्त केली़ याप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती केदा अहेर, माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, शिक्षण सभापती किरण थोरे, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शोभा ढोकळे, उषा बच्छाव, रंजना पवार, सुनीता चव्हाण, केरू पवार, सुभाष चौधरी, अर्जुन बर्डे, केदा शिरसाठ, भिका राठोड, सुभाष कराड, जयंत वाघ, धर्मराज पवार, अलका चौधरी, कमलाबाई सोनवणे, ज्ञानेश्वर पवार आदि उपस्थित होते़

Web Title: Publication of calendar of Agriculture, Animal Husbandry Department