शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तरतूद ९७ कोटींची, खर्च फक्त १८ लाख रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:27 IST

जिल्ह्णाच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांची शासनाने तरतूद करूनही निधी खर्चात नाशिक जिल्हा ३०व्या क्रमांकावर असल्याचे वास्तव उघडकीस आल्याने जिल्ह्णाच्या पिछेहाटीची व त्यामागील कारणांची जोरदार चर्चा होत असताना त्यात राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाचीही भर पडली आहे. अनुसूचित जाती घटकांच्या मूलभूत विकासासाठी नियोजन समितीकडून आर्थिक वर्षासाठी ९७ कोटी ५० लाखांची तरतूद असताना गेल्या दहा महिन्यांत फक्त १८ लाख रुपये म्हणजे ०.८१ टक्केच खर्च होऊ शकल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण : दलित वस्ती सुधारणा कागदावरच

नाशिक : जिल्ह्णाच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांची शासनाने तरतूद करूनही निधी खर्चात नाशिक जिल्हा ३०व्या क्रमांकावर असल्याचे वास्तव उघडकीस आल्याने जिल्ह्णाच्या पिछेहाटीची व त्यामागील कारणांची जोरदार चर्चा होत असताना त्यात राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाचीही भर पडली आहे. अनुसूचित जाती घटकांच्या मूलभूत विकासासाठी नियोजन समितीकडून आर्थिक वर्षासाठी ९७ कोटी ५० लाखांची तरतूद असताना गेल्या दहा महिन्यांत फक्त १८ लाख रुपये म्हणजे ०.८१ टक्केच खर्च होऊ शकल्याचे उघडकीस आले आहे.जिल्हा नियोजन विकास समितीची गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक घेतली असता, त्यात विकासकामात जिल्हा पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेबरोबरच अन्य खात्यांसाठीही करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीपेक्षाही या खात्यांनी खर्च न केल्याचे उघडकीस आले आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती विकासासाठी ९७ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून शहरी व ग्रामीण भागातील दलित वस्तीत सुधारणा योजना राबविण्यासाठी सदरची तरतूद आहे. त्यात प्रामुख्याने दलित वस्तीत रस्ते, पाणी, गटार, समाजमंदिर, पथदीप, हायमास्ट बसविणे, समाजमंदिराची उभारणी आदी मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर निधी खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्णातील ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक ठिकाणी दलित वस्त्यांमध्ये अद्यापही विकास पोहोचू शकलेला नसताना समाजकल्याण खात्यासाठी तरतूद केलेल्या निधीतून विकासाची गंगा पोहोचविणे गरजेचे असताना चालू आर्थिक वर्षातील दहा महिन्यांत समाजकल्याण खात्याने अनुसूचित जातींशी आपले काही देणे-घेणे नसल्याचे समजून त्यांना विकासापासून वंचित ठेवले आहे. जानेवारी महिन्यांपर्यंत या खात्याने जेमतेम १८ लाख रुपये खर्च केले असून, अन्य रक्कम तशीच पडून आहे. एकूण तरतुदीतून केलेला खर्च वजा जाता खर्चाचे प्रमाण ०.८१ टक्के इतकेच आहे. यंदा हा निधी खर्च न झाल्यास पुढील आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारकडून समाजकल्याण खात्याला निधी मिळणे अशक्य असून, या साऱ्या बाबीस जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे.विकास निधी खर्च करण्यात नाशिक जिल्हा राज्यात ३०व्या क्रमांकावर असल्याचे वास्तव उघडकीस आले असून, राज्य सरकारच्या अखत्यारितील समाजकल्याण खात्यानेही दलित विकासात काहीच दिवे लावलेले नसल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Social welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय