शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

२५ टॅँकर्स भाड्याने घेण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: April 2, 2016 00:02 IST

पाणीटंचाई : प्रभागांमध्ये बसविणार सिंटेक्सच्या टाक्या

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, एप्रिल-मे महिन्यांत ऐन उन्हाळ्यात पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी २५ टॅँकर्स भाड्याने घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय, सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीकाळासाठी खरेदी केलेल्या सिंटेक्सच्या सुमारे ८०० टाक्या प्रत्येक प्रभागांमध्ये पुरविल्या जाणार आहेत. महापालिकेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी एकवेळ आणि दर गुरुवारी बंद राहणारा पाणीपुरवठा यामुळे नाशिककरांच्या त्रासात भर पडते आहे. शुक्रवारी सकाळी अनेक भागांत कमी दाबाने व विस्कळीत स्वरूपात पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या. पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेबाबत अजूनही प्रशासन चाचपडते आहे. सत्ताधारी मनसेने स्वखर्चाने पाणीपुरवठ्यासाठी टॅँकर्सची व्यवस्था केली असली तरी ती अपुरी ठरत आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडून सप्ताहातील एक बंद वार वगळता इतर सहा दिवसांत सुमारे ७० दलघफू पाणी गंगापूर धरणातून उचलले जात आहे. गंगापूर धरणात सध्या गंगापूर धरणात १६२४ दलघफू (२८.८४ टक्के), दारणात १७९१ दलघफू (२५ टक्के), कश्यपीमध्ये ५५७ दलघफू (३१ टक्के) याप्रमाणे पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेने गंगापूर धरणातून आतापर्यंत १९८२ दलघफू, तर दारणातून ११३ दलघफू पाण्याची उचल केलेली आहे. गंगापूर धरणातून मनपाला ३१ जुलैअखेर ११३० आरक्षित पाणीसाठा उचलता येणार आहे, तर दारणातून अद्याप १८६ दलघफू पाणीसाठा उचलता येऊ शकेल. महापालिकेला प्रति सप्ताह ७० दलघफू पाण्याची आवश्यकता असल्याने ३१ जुलैपर्यंत ११९० दलघफू पाणी लागणार आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते आहे शिवाय एप्रिल-मे महिन्यांत पाण्याची मागणी वाढणार असल्याने महापालिकेने २५ टॅँकर्स भाड्याने घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सद्यस्थितीत मनपाकडे स्वत:चे ८ टॅँकर्स आहेत. याशिवाय सिंहस्थात घेण्यात आलेल्या ८०० सिंटेक्सच्या टाक्या प्रभागांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. (प्रतिनिधी)