नाशिकमध्ये मेट्रोसाठी १८०० कोटींचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 02:00 AM2019-06-04T02:00:23+5:302019-06-04T02:00:39+5:30

नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या नाशिक मेट्रोसाठी १८०० कोटी रुपयांचा प्राथमिक प्रकल्प अहवाल महाराष्टÑ मेट्रो रेल ...

 Project of 1800 crores for Metro in Nashik | नाशिकमध्ये मेट्रोसाठी १८०० कोटींचा प्रकल्प

नाशिकमध्ये मेट्रोसाठी १८०० कोटींचा प्रकल्प

googlenewsNext

नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या नाशिकमेट्रोसाठी १८०० कोटी रुपयांचा प्राथमिक प्रकल्प अहवाल महाराष्टÑ मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महामेट्रोने सादर केला आहे. व्यवहारता पडताळणीदेखील करण्यात आली असून, आता महापालिका आणि म्हाडाच्या मतप्रदर्शनानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्याच्या विकासकामांच्या आढाव्यासाठी बैठक घेतली होती.  त्यावेळी नाशिक महापालिकेची स्वतंत्र बैठक घेताना त्यांनी बससेवेचा आढावा घेतला होता. त्याचवेळी त्यांनी नाशिककरांसाठी मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. नाशिककरांची बससेवा किंवा अन्य बाबीच पूर्ण होत नसतानाच थेट मेट्रोसेवा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी हे नवे स्वप्न दाखवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र आता त्यानंतर काहीही बैठकाही झाल्या होत्या आणि आता तर १८०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प अहवालच महामेट्रोने सादर केला आहे.
केंद्र आणि राज्य शासनाचा महामेट्रो हा संयुक्त उपक्रम असून पुणे आणि नागपूर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यानंतर आता नाशिकमध्येदेखील हे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो हा एक प्रभावी उपाय असून ८० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. त्यासाठी दोन ट्रॅकचा २८ किलोमीटर एलीव्हेटेड कोरीडोर असेल. रुळ ऐवजी रबर टायरचा वापर असलेली ही मेट्रो विजेवर चालेल. मेट्रो हा सार्वजनिक वाहतुकीसाठी अलीकडच्या काळात सर्वात प्रभावी आणि माफक खर्चातील साधन आहे. पारंपरिक वाहतूक साधनाच्या तुलनेत हे वेगळे साधन नाशिककरांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
घबाड योग
लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर आता अनेक योजना मार्गी लागण्याची शक्यता आहे. मेट्रोचा विषय त्यामुळेच लवकर मार्गी लावण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. शहरात जलवाहिन्यांचे तसेच मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी यापूर्वी महापालिकेने सातशे कोटी रुपयांचे प्रकल्प अहवाल सादर केले आहेत.

Web Title:  Project of 1800 crores for Metro in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.