शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षाचे दर घसरल्याने उत्पादक चिंतित

By admin | Updated: April 5, 2017 00:45 IST

युरोपात नाशिकच्या द्राक्षांना स्पर्धा : नवीन वाण विकसित करण्याची गरज

नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून युरोपसह विविध देशांमध्ये द्राक्षाची निर्यात होते. गेल्या दोन-तीन वर्षांत दुष्काळी परिस्थिती असतानाही ७६ हजार टनहून अधिक द्राक्षांची निर्यात झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीही मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन झाले आहे; मात्र यावर्षी थंडी अधिक काळ रेंगाळल्याने द्राक्षांचे मणी वाढू शकले नाही. शिवाय द्राक्षांमध्ये साखर भरण्याचे प्रमाणही परदेशी मालाच्या तुलनेत कमी राहिल्याने युरोपात नाशिकच्या द्राक्षांना मागणी घटली आहे. त्यामुळे उत्पादकांनी देशांतर्गत बाजारपेठेत माल पाठविला. परंतु उत्पादनच मोठ्या प्रमाणात आले असल्याने द्राक्षाचे भाव १५ ते २० रुपयांनी घसरले असून, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून मागील वर्षी युरोपमध्ये ७६ हजार ४२५ टन, तर युरोपव्यतिरिक्त अन्य देशांत सुमारे २५ हजार टन द्राक्ष निर्यात झाली होती. त्या तुलनेत यंदा युरोपात आतापर्यंतच ८० हजार टन द्राक्षे पाठविण्यात आली असून, यातील मोठा माल बाजारात पडून आहे. युरोप व्यतिरिक्त अन्य देशांत सुमारे २५ हजार ५०० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यंदा कॅनडा, रशिया, चीनसह बांगलादेशातही द्राक्षे पाठविण्यात आली आहेत. युरोपात नाशिकच्या द्राक्षांसोबतच अन्य देशांमधूनही द्राक्षांचीही आयात होऊ लागल्याने भारतीय द्राक्षांच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या वर्षी युरोपमध्ये एका किलोला रु. ४५ ते ५० आणि इंग्लंडमध्ये ६० ते ६५ रुपये असा भाव मिळाला होता; मात्र यंदा अन्य देशांमधून युरोपात मोठ्या प्रमाणात आलेल्या द्राक्षांमुळे भारतीय द्राक्षांना युरोपमध्ये ३८ ते ४२ तर इंग्लंडमध्ये ५० ते ५५ रुपये भाव मिळतो आहे. युरोपमध्ये भारताशिवाय चिलीसारख्या देशामधून येणाऱ्या द्राक्षांचा कालावधी संपत आला असून, असून लवकरच युरोपात दाखल होणारी ही द्राक्षे कमी होण्याची शक्यता आहे, ही द्राक्षे कमी झाल्यानंतर नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना निर्यातवृद्धीची आशा आहे. दरम्यान, निर्यातदर कमी मिळत असल्याने काढलेली द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेत पाठविण्यात येत आहेत; परंतु देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षांना फारशी मागणी नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या भावात किलोमागे ५ ते १० रुपयांची घसरण झाली आहे. (प्रतिनिधी)