शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात पारितोषिक वितरण

By admin | Updated: January 8, 2017 01:01 IST

गणेशोत्सव स्पर्धा : बावीस मंडळांचा यथोचित गौरव

येवला : शहरात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून सर्वच स्तरांतून प्रयत्न करण्यात येतात यादृष्टीने यावर्षी पोलीस विभागातर्फे जातीय सलोखा प्रस्थापित करून आनंदाने धार्मिक उत्सव साजरे व्हावेत यासाठी सामाजिक सद्भाव गणेशोत्सव चषक स्पर्धेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला.
सामाजिक सद्भाव स्पर्धेत येवला शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एकूण बावीस मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी रायगड ग्रुप, एन्झोकेम विद्यालय, स्वामी मुक्तानंद विद्यालय, जनता विद्यालय, पैलवान राजेंद्र लोणारी, अविनाश कुक्कर, राजू पवार, डॉ. भूषण शिनकर, अमोल शिंदे, काझी राफिउिद्दन, परदेशपुरा तालीम संघ, सहारा हॉटेलचे संचालक, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रत्येक इव्हेंटसाठी ५५०० रु., ३३०० रु., २१०० अशी रोख पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. मनमाड पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, नगरसेवक सचिन शिंदे, गणेश शिंदे, राजेंद्र लोणारी, रुपेश लोणारी, सचिन मोरे, प्रशांत शिंदे, प्रमोद तक्ते यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. परदेशपुरा तालीम संघाच्या शेवटच्या मानाच्या गणपती मंडळाचे प्रमुख प्रेमसिंग परदेशी यांनी २२ गणेश मंडळांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी जातीय सलोखा राखत गणेशोत्सवासह सर्व धार्मिक उत्सव शांततेत पार पडून पोलीस विभागाला सहकार्य केल्याची आठवण देऊन आगामी संक्रांत उत्सवाचा बेरंग होऊ नये म्हणून नायलॉन मांजाचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी थेट तपासणी करून गुन्हे दाखल केले आहेत. नायलॉन दोरा न वापण्याचे आवाहन केले पाटील यांनी केले. यावेळी माणिकराव शिंदे यांचे भाषण झाले. पोलीस दलातील अधिकारी सोमनाथ लोंढे, रामदास बैरागी, अभिमन्यू आहेर यांचा चांगल्या कामानिमित्त गौरव करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)