शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटी रुपयांच्या बाजार फी वसुलीसाठी खासगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:15 IST

महापालिकेला दहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देताना कमीत कमी त्यातील कमीत कमी कमिशन जो प्रस्तावित करेल, अशा ठेकेदाराला हे ...

महापालिकेला दहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देताना कमीत कमी त्यातील कमीत कमी कमिशन जो प्रस्तावित करेल, अशा ठेकेदाराला हे काम देण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे काटेकोरपणे वसुली होण्याचा अंदाज आहे.

महापालिकेने शहरात फेरीवाला क्षेत्र घोषित केले असून, त्यात अधिकृतरीत्या वसवलेले सुमारे नऊ हजार फेरीवाले आणि विक्रेते आहेत; परंतु अनेक ठिकाणचे फेरीवालाक्षेत्रदेखील रद्द झाले आहेत. त्यातच महापालिकेच्या वतीने जे अधिकृत फेरीवाले नाहीत त्यांच्याकडूनदेखील बाजार फी वसूल केली जात होती. त्यामुळे सुमारे दोन कोटी रुपये उत्पन्न मिळत असले तरी डॉन बॉस्कोजवळ महापालिकेने बेकायदेशीररीत्या वसवलेल्या फेरीवालाक्षेत्राकडून वसुली सुरू असल्याचे प्रकरण प्रशासनाच्या अंगाशी आले. बेकायदेशीर फेरीवाल्यांकडून महापालिका शुल्क वसूलच कसे काय करते, असा प्रश्न उच्च न्यायालयाने केल्याने शहरातील बाजार शुल्क वसुली सध्या बंद आहे. फेरीवालाक्षेत्रात असलेल्या विक्रेत्यांकडून वसुली करायची, तर अनेकांना त्यांच्या जागेचे पत्रच दिलेले नव्हते, अशा अनेक घोळानंतर आता अधिकृत विक्रेत्यांकडून वसुली सुरू असली तरीही पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे नियम पडताळून वसुली तपासली तरी दहा कोटी रुपयांच्या घरात जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानुसार वसुली करण्यासाठी महापालिकेकडे अपेक्षित मनुष्यबळ नसल्याने बाजार फी वसुलीचा ठेका देण्याचा प्रस्ताव आहे. किमान दहा काेटी रुपये वसूल करून देताना जो कमीत कमी कमिशन आकारेल त्याला ठेका देण्याची पद्धती अवलंबिण्यात येेणार आहे. त्यामुळे अधिकाधिक महसूल मिळेल, असा महापालिकेच्या मूल्यांकन व करवसुली विभागाचा दावा आहे.

इन्फो...

बेकायदेशीर फेरीवाले हटणार

केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणांतर्गत बायोमेट्रिक हजेरी आणि ओळखपत्र दिलेले विक्रेतेच अधिकृत असून, त्यांच्याकडून वसुली करता येऊ शकते. बाकीच्या फेरीवाल्यांना हटवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे आता फेरीवाला झोनची पुनर्रचना करून वाढलेल्या फेरीवाल्यांनादेखील सामावून घ्यावे लागणार आहे. मात्र, यासंदर्भातील अतिक्रमण विभागाची कार्यवाही सध्या ठप्प आहे.