शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असुविधांचा पसारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 17:12 IST

त्र्यंबकेश्वर : मुलींनी वाचला समस्यांचा पाढा, दुर्लक्षाबद्दल संताप

ठळक मुद्देमुलींचे वसतिगृह असूनही इमारतीला संरक्षण भिंत नाही

त्र्यंबकेश्वर : येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींसाठी असलेल्या वसतिगृहात असुविधांचा पसारा वाढत चालल्याचे सांगत एकेक समस्यांचा पाढा वसतिगृहातील विदयार्थिनींनी पत्रकारांसमोर बोलताना वाचला. कडाक्याच्या थंडीतही मुलींना थंडगार पाण्याने स्नान करावे लागते, वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहात अंधार असतो अशा एक ना अनेक तक्रारी करत मुलींनी सामाजिक न्याय विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला.महाराष्ट्र शासनाच्या नाशिक सामाजिक न्याय विभागाचे त्र्यंबकेश्वर रिंगरोडवर मुलींसाठी वसतिगृह आहे. सदरचे वसतिगृह गावापासून दीड ते दोन कि.मी.अंतरावर एकांत जागी आहे . ही इमारत फक्त पुर्वेकडे बंदीस्त आहे. तर अन्य बाजू मोकळ्याच आहेत. मुलींचे वसतिगृह असूनही इमारतीला संरक्षण भिंत नाही. एकांत जागी असल्याने इमारतीत सर्पांचा वावर आहे. वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सर्व मुली माधवगिरी महाराजांच्या संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात पाणी पिण्यासाठी जात असतात. टॉयलेट बाथरु ममध्ये अंधार असतो. मध्यंतरी रात्री होस्टेलवर दगड येत असत. पोलीसांकडे तक्र ार केल्यावर पोलीसांनी गस्त सुरु केल्यामुळे लगेच दगडफेकीचा प्रकार बंद झाला. वॉर्डनकडे असलेले अधिकारही सीमित आहेत. त्यांच्या अधिकाराच्या पुढील कोणतेही काम करायला वरिष्ठांकडे अर्ज करावे लागतात. गरम पाण्यासाठी बंब करायचा आहे मात्र, चार महिन्यांपासून नाशिक कार्यालयात त्यासंबंधीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ऐन थंडीत मुलींना थंड पाण्याने स्नान करावे लागत आहे. एकीकडे मुलींसाठी शिक्षणाबाबत शासन अग्रेसर असताना शासनाच्याच विभागाकडून सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल मुलींनी संताप व्यक्त केला. यावेळी वसतिगृहाच्या वॉर्डन उपस्थित होत्या.

टॅग्स :NashikनाशिकSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय