शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मटण मार्केटची इमारत पाडण्याची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST

नांदगाव : गेले चार महिने नगरपरिषद व मटण मार्केटची इमारत या वादात अडकलेला रस्ता मोकळा होण्याची ...

नांदगाव : गेले चार महिने नगरपरिषद व मटण मार्केटची इमारत या वादात अडकलेला रस्ता मोकळा होण्याची चिन्हे दिसून येत असली तरी नगर परिषदेच्या हद्दीतून जाणारा रस्ता आगामी काळात कशी वळणे घेणार याची प्रचंड उत्सुकता नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मटण मार्केटची इमारत पाडण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून गाळा धारकांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

इमारत पाडल्यानंतर नियोजित मार्ग भोंगळे रस्त्याला संलग्न होऊन पुढे सरळ समता मार्गाने ढवळे बिल्डींगपर्यंत नेल्यास शहरास बाजारपेठेसाठी नवीन जागा मिळणार असल्याने कोंडलेल्या बाजारपेठेचा विस्तार होणे अपेक्षित आहे. तसेच शहरातील रहदारीची कोंडी काही प्रमाणात कमी होणार असल्याने नागरिक प्रशासनाच्या पुढच्या पावलाच्या प्रतीक्षेत आहे. इमारत पाडल्यानंतर प्रशासनाने पुढचे काम त्वरित हाती घ्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

सबवेच्या कामात अगोदर आराखडा चुकल्याचा मुद्दा पुढे आणला गेला. त्यानंतर आता संलग्नतेच्या प्रश्नावरून वातावरण ढवळून निघाले आहे. ‘विकास हवा. मात्र सोयीचा’ अशी विकासमार्गाची धारणा असल्याने एकूणच जे रेल्वे फाटकाचे झाले तसे सबवेच्या बाबतीत घडायला नको याबाबतीत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे.

इन्फो

नगरपरिषदेच्या कोर्टात चेंडू

आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी दोन महिने आधी झालेल्या बैठकीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी कार्यवाही बाबतीत जाहीर केलेल्या भूमिकेला अनुसरून कृती केली नसल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. आता न्यायालयाने कार्यवाही करण्याची मुभा पालिकेला दिल्याने पालिकेच्या कोर्टात आलेला चेंडू कसा टोलवायचा हे सर्वस्वी मुख्याधिकाऱ्यांवर विसंबून राहणार आहे.

सबवेचे काम पूर्ण केल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने न्यायालयात लिखित स्वरुपात केल्यामुळे पुढील कार्यवाहीची जबाबदारी आपोआपच पालिका प्रशासनावर येऊन पडली आहे. छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही त्यामुळे ऐरणीवर आला आहे.