शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  शहरातून ८५ शस्त्रे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 1:12 AM

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एकूण १ हजार २५९ परवानाधारकांपैकी २२५ परवानाधारकांची २४० शस्त्र जमा करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, यापैकी ८५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एकूण १ हजार २५९ परवानाधारकांपैकी २२५ परवानाधारकांची २४० शस्त्र जमा करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, यापैकी ८५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीक ांत पाटील, अमोल तांबे, माधुरी कांगणे, पौर्णिमा चौघुले उपस्थित होते.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत असलेल्या १०५३ मतदान केंद्रांमध्ये २०१९ मध्ये ५३ केंद्राची वाढ झाली असून, आता शहरात एकूण ११०६ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ४३ केंद्र संवेदनशील आहेत. सर्व मतदान केंद्रांना संबंधित अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहरात जानेवारीपासून ३० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून, गेल्या वर्षभरात १०५ जणांवर हद्दपारीची कारवाई झालेली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईत आचारसंहिता लागू झाल्यापासून दारूबंदीच्या ३४ची प्रकरणे दाखल झाली असून, १४५ लिटर मद्य जप्त करताना ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शस्त्र कायद्यानुसार, सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन गावठी कट्टे, पाच काडतुसे, चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे ३७ जणांवर कारवाई करण्यात आली असून, कोपटा अंतर्गत ११७, ६ जुगारी, ११३ भरधाव वाहनचालकांसह मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४५ व सीआरपीसी अंतर्गत १४०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर ६७८ गुन्हेगारांना नॉन अजामीनपात्र वॉरंट आणि ४५० वॉरंट बजावल्याचे त्यांनी सांगितले.२३९ वेळा नाकाबंदीआचारसंहिता लागू झाल्यापासून शहरात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत २३९ वेळा रात्री १२ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली आहे. पुढील बंदोबस्तासाठी यासाठी बाहेरून ६१७ पोलीस कर्मचाऱ्यांसह ६८३ होमगार्डही तैनात करण्यासोबत पोलीस आयुक्तालयातील ८० टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात वापरले जाणार असून, क र्मचाºयांना आचारसंहिता भंगाविषयी सी-विजिल अ‍ॅपवरील तक्रारी प्रशिक्षण देण्यात आले असून, व्हीआयपी सुरक्षेसाठी सीआयएसएफकडून २६ मार्चला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील