शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत परीक्षेची शिक्षा

By admin | Updated: June 24, 2014 00:45 IST

नाशिक:पोलीस भरतीत परीक्षेची शिक्षा

नरेश हाळणोर ल्ल नाशिकपरीक्षा म्हटली की शाळा-महाविद्यालयांचा वर्गच नजरेसमोर यावा. मात्र पोलीस प्रशासनाची परीक्षाच निराळी. वर्ग नाही, पर्यवेक्षक नाही... थेट मोकळ्या मैदानावर परीक्षा आणि तीही सुमारे चार हजार उमेदवारांची. जिथे ३०/४० विद्यार्थ्यांच्या वर्गावर दोन-दोन पर्यवेक्षक असताना कॉपी चालते तिथे खुल्या मैदानावरील चार हजार उमेदवारांची परीक्षा कशी होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. मुळात रविवार असल्याने शहरातील सर्वच शाळा-महाविद्यालयांना सुटी असताना, एखाद्या मोठ्या संस्थेत सदरची परीक्षाप्रक्रिया राबविता येणे अशक्य नाही. तरीही पोलीस प्रशासनाकडून पारंपरिक पद्धतीनेच परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी हे जसे अनाकलनीय तसेच उमेदवारांनाही ‘शिक्षा’च ठरण्याची अधिक शक्यता आहे.नाशिक शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत ४७१ पोलीस शिपाई पदासाठी गेल्या ६ तारखेपासून पोलीस कवायत मैदानावर शारीरिक चाचणी घेण्यात आली. यासाठी सुमारे दहा हजारांपेक्षाही अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदविला आणि त्यात मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारे ४२८१ जणांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली आहे. सदरची लेखी परीक्षा येत्या रविवारी (दि. २९) पोलीस कवायत मैदानावरच होणार आहे. यासाठी निवड झालेल्यांना सकाळी ६ वाजताच मैदानावर हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून गेल्या कित्येक वर्षांच्या पारंपरिक पद्धतीने मैदानावरच उमेदवारांना बसवून लेखी परीक्षा घेतली जाते. मात्र अलीकडच्या काळात अनेक सोयीसुविधा असतानाही नाशिक शहर पोलीस प्रशासनाकडूनही त्याच पद्धतीने अर्थात कवायत मैदानावर ४२८१ उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सदरची परीक्षा रविवारी असल्याने जवळपास सर्वच शैक्षणिक संस्थांना सुटीच असताना, त्याठिकाणी सदरची लेखी परीक्षा घेता येणे शक्य आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या वातावरणात पेपर सोडविता येऊ शकेल, तसेच सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान ऊनही चांगलेच त्रासदायक ठरणारे असल्याने त्यापासून परीक्षार्थींचा बचावही होऊ शकणार आहे. कोणतीही भरतीप्रक्रिया असो, त्यातून गुणवत्ता असलेल्यांची निवड व्हावी या हेतूनेच त्यासाठीची परीक्षा घेतली जावी, असे असताना पोलीस प्रशासनाकडून सदरची परीक्षा मैदानावर राबविण्याचा अट्टहास केला जातो आहे. मात्र, पाऊस आल्यास परीक्षेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला खरा; पण सदरची प्रक्रिया शाळा महाविद्यालयाच्या आवारात राबविल्यास ते प्रशासन आणि उमेदवारांच्या दृष्टीने अधिक सोयीचे ठरू शकणार आहे.