पोलिसांची निवडणुकीची तयारी

By Admin | Updated: January 20, 2017 01:28 IST2017-01-20T01:28:19+5:302017-01-20T01:28:33+5:30

रवींद्र सिंघल : संशयित गुन्हेगारांची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार

Police preparations are ready | पोलिसांची निवडणुकीची तयारी

पोलिसांची निवडणुकीची तयारी

नाशिक : आगामी मनपा निवडणूक काळात कायदासुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अशा संशयित सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम आखण्यात आली असून, शहर ‘भयमुक्तच’ राहील, अशी ग्वाही पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली.
सन २०१६ मधील वार्षिक गुन्हेगारी नियंत्रण आढावा बैठक पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली होती. गुन्हेगारी घटनांचा पोलिसांनी लावलेला छडा आणि न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्यात आलेले यश तसेच पोलीस प्रशासनाकडून जनता व पोलिसांमधील सुसंवाद वाढविण्यासाठी राबविले जाणाऱ्या लोकाभिमुख उपक्रमांचा आढावा सिंघल यांनी घेतला. उपआयुक्त दत्ता कराळे, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त सचिन गोरे, अतुल झेंडे, डॉ. राजू भुजबळ यांच्यासह प्रमुख पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही. लोकशाहीचा हक्क निसंकोचपणे बजवावा. कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. गुन्हेगार हा केवळ गुन्हेगारच असतो, त्याचा कुठलाही राजकीय पक्ष नाही किंवा जात -धर्म नाही, असे सिंघल यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Police preparations are ready