सिडको, अंबड येथील उत्सवावर पोलिसांची नजर

By Admin | Updated: September 6, 2016 01:21 IST2016-09-06T01:20:49+5:302016-09-06T01:21:56+5:30

सिडको, अंबड येथील उत्सवावर पोलिसांची नजर

Police look at the festival of CIDCO, Ambad | सिडको, अंबड येथील उत्सवावर पोलिसांची नजर

सिडको, अंबड येथील उत्सवावर पोलिसांची नजर

 सिडको : अंबड भागात यंदाच्या वर्षी लहान व मोठी मिळून शंभराहून अधिक मंडळांनी अंबड पोलिसांकडून परवानगी घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशनुसार यंदाच्या वर्षी सार्वजनिक मंडळांना डीजेचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सिडको भागातील सिडको वसाहत मित्रमंडळ, राजे छत्रपती मित्रमंडळ, शिवराज युवक मित्रमंडळ, श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ, त्रिलोकेश्वर मित्रमंडळ, महाकाली सोशल ग्रुप, शिवसाई सामाजिक विकास संस्था आदिंसह परिसरातील मंडळांकडून दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक देखावे याबरोबरच प्रबोधनपर देखावे सादर करण्यावर भर दिला जातो. यामुळे दरवर्षी नाशिक शहराप्रमाणेच सिडको भागातही देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी असते. गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्न पार पडावा यासाठी तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहणार आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून चित्रीकरण करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Police look at the festival of CIDCO, Ambad