शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीनंतरही चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी

By admin | Updated: July 19, 2014 01:05 IST

नाकाबंदीनंतरही चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी

पंचवटी : शहरात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालून पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याने संशयितांच्या शोधार्थ नाकाबंदी सुरू केली आहे. मात्र नाकाबंदीनंतरही शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच असल्याने पोलिसांना अपयश येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांत शहरात पाच ते सहा ठिकाणी सोनसाखळी ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने शहरात सर्वत्र नाकाबंदी सुरू केली. मात्र चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आले. शहरात सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी तसेच रोकड लुटून नेण्याचे प्रकार घडले असले, तरी पोलीस अद्यापही संशयितांपर्यंत पोहचू न शकल्याने पोलिसांच्या कामगिरीविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतील गुन्हे शोध पथकाला व खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांना मरगळ आल्यानेच चोरट्यांना मोकळे रान मिळाले असल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे. शहरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे आणि पोलीस प्रशासनाकडून केवळ बघ्याचीच भूमिका घेतली जात असल्याने शहरातील गुन्हेगारी वाढली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे; मात्र पोलिसांमधील मरगळ हटत नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)