युवकाच्या खुनातील संशयितास पोलीस कोठडी

By Admin | Updated: March 2, 2015 00:05 IST2015-03-01T23:49:04+5:302015-03-02T00:05:28+5:30

युवकाच्या खुनातील संशयितास पोलीस कोठडी

Police cell suspect in the murder of a young man | युवकाच्या खुनातील संशयितास पोलीस कोठडी

युवकाच्या खुनातील संशयितास पोलीस कोठडी

नाशिक : विंचूर गवळी शिवारातील नवजीवन पब्लिक स्कूलच्या मैदानावर अनैतिक संबंधातून खून करण्यात आलेल्या राजू हिंगोले या युवकाच्या खून प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित कैलास उर्फ बाळू विश्वनाथ खिल्लारे यास न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, या प्रकरणी प्रदीप ज्ञानबा खिल्लारे व गजानन कुऱ्हाडे या दोघा संशयितांना रविवारी आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले़ अनैतिक संबंधाच्या कारणावरून या तिघांनी राजू हिंगोले या युवकास जबर मारहाण केली होती़ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी राजू हिंगोलेचा मृत्यू झाल्याने हा प्रकार उघडकीस आला होता़ (प्रतिनिधी)

Web Title: Police cell suspect in the murder of a young man