भोंदूबाबा अशोक खरातनाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून विधीसाठी वस्तू आणायचा, अशी चर्चा असल्याने विशेष तपास पथकाने मंगळवारी इगतपुरी तालुक्यात धडक देत चौकशी केली.
प्राथमिक माहितीनुसार, नांदगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या एका स्थानिक बाबाच्या घरी खरात नियमित येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दुव्याची शहानिशा करण्यासाठी तपास पथक गावात सखोल चौकशी करणार आहे. तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक भोंदूबाबामार्फत खरातला गंडे दोरे, अंगठ्या यांसारख्या वस्तू पुरवल्या जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, खरातच्या आर्थिक व्यवहारांमधून या स्थानिक भोंदूबाबाच्या नावावर इगतपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशयही तपासात व्यक्त होत आहे.
एक किलोच्या मधासाठी नऊ लाख रुपये
शरीरातील ऊर्जा वाढविणे, अशक्तपणा दूर करणे, पुरुषत्वात वाढ करणे तसेच विविध शारीरिक समस्यांवर हमखास उपाय मिळतो, अशी बतावणी करून भोंदू अशोक खरात याने अनेक नागरिकांना गंडा घातल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. विशेष म्हणजे, 'तुर्की मध' म्हणून विक्री करण्यात येणाऱ्या मधाच्या एका किलोसाठी तब्बल नऊ लाख रुपये आकारले जात असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
दैवी शक्ती, खोलीत पवित्र आत्मा, तीर्थ, पूजा...; महिलांना 'असं' जाळ्यात अडकवायचा अशोक खरात
अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या या फसवणुकीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'तुर्की मध' हे दुर्मिळ असून, त्याच्या सेवनामुळे शरीरात तात्काळ ऊर्जा निर्माण होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, अशी खोटी माहिती देऊन दिशाभूल केली जात होती.
खरातची वैद्यकीय चाचणी
अटकेत असलेल्या अशोक खरातला पोलिस चौकशीसाठी नेत असताना दोन दिवसांपूर्वी तो अत्यंत आजारी असल्याप्रमाणे खाली वाकून आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचे हात धरून चालत असल्याचे दिसत होते. मात्र, मंगळवारी (दि. २४) न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याची जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करून आणण्यात आले होते.
Video - "चिखलफेक करणारी विकृती..."; रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर; बोटावरच्या जखमेचं 'सत्य'
लोकसभा निवडणुकीपूर्वी जाणारा 'तो' खासदार कोण?
भोंदू अशोक खरात याच्या संपर्कात अनेक राजकीय नेते होते. निवडणुकीपूर्वी भविष्य पाहून येणाऱ्या अनेक नेत्यांच्या नावांचीदेखील चर्चा आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील एक उमेदवार जो आता खासदार आहे, त्यानेदेखील खरातकडे हजेरी लावल्याची चर्चा आहे. हा खासदार कोण, कोणत्या पक्षाचा याबद्दलदेखील चर्चा सुरू आहे.
Web Summary : Ashok Kharat's fraudulent activities involved sourcing items from another local guru. He sold honey for exorbitant prices, falsely claiming health benefits. Investigations reveal potential property acquisitions under the local guru's name and links to politicians before elections, including a current MP.
Web Summary : अशोक खरात की धोखाधड़ी में एक और स्थानीय गुरु से वस्तुएं प्राप्त करना शामिल था। उसने स्वास्थ्य लाभ का झूठा दावा करते हुए भारी कीमतों पर शहद बेचा। जांच से स्थानीय गुरु के नाम पर संभावित संपत्ति अधिग्रहण और चुनावों से पहले राजनेताओं से संबंध सामने आए, जिसमें एक मौजूदा सांसद भी शामिल है।