शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाच्या व्यथांची जाणीव करून देणारा काव्यसंग्रह

By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST

लक्ष्मण महाडिक : ‘तहानलेलं पाणी’चे प्रकाशन

नाशिक : संवेदना जपल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो आणि जगण्याची व लिखाणाची गोष्ट एकच असते, ती म्हणजे मनाचा सुरू असलेला संघर्ष. निसर्गाने ओढ दिल्यानंतर बळीराजाच्या मनाच्या व्यथांची जाणीव ‘तहानलेलं पाणी’ या काव्यसंग्रहातून होते, असे प्रतिपादन कवी लक्ष्मण महाडिक यांनी केले.गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात कवी मारुती सावंत लिखित ‘तहानलेलं पाणी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शब्दांची गुंफण करत कवी आपल्या कविता पूर्ण करत असतो. यादरम्यान त्याचा आपल्या मनाशी संघर्ष सुरू असतो. जेव्हा एखाद्या कवीचा काव्यसंग्रह प्रकाशित होतो, तेव्हा त्याला आपल्या मेहनतीचे चीज झाले असे वाटते. आपली कविता जनसामान्यांच्या हातात पडते तेव्हा कवीला होणारा आनंद हा गगनात मावेनासा असतो. याप्रसंगी व्यासपीठावर सावंत यांच्या मातोश्री सरस्वती सावंत, पी. एम. वाकडे, जी. जी. सोनार, विष्णू गोरे, शीतल सावंत, मारुती सावंत उपस्थित होते. सावंत यांनी लिहिलेल्या कवितांमधून शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सावंत यांनी काव्यसंग्रहातील काही कविता सादर करून उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. (प्रतिनिधी)