शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल विक्रीसाठी आलेल्या सिन्नरच्या शेतकऱ्याची लूट

By admin | Updated: September 11, 2016 01:40 IST

शेतमाल विक्रीसाठी आलेल्या सिन्नरच्या शेतकऱ्याची लूट

 नाशिक : दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डमध्ये शेतमाल विक्री केल्यानंतर घरातील कुटुंबीयांसाठी खारी खरेदी करणाऱ्या सिन्नरच्या शेतकऱ्यास पेठ रोडवरील तिघा संशयितांनी लुटल्याची तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली़ पंचवटी पोलीस ठाणे जवळ असूनही घडलेल्या या घटनेमुळे शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी येथील शेतकरी राजेंद्र पोपट उगलेहे गुरुवारी (दि़ ८) वाटाणे विक्रीसाठी दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डात आले होते़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाटाणे विक्रीतून आलेल्या पैशातून ते कुटुंबातील लहान मुलांसाठी मार्केट यार्डच्या गेटजवळील दुकानातून खारी खरेदी करीत होते़ यावेळी संशयित जोसेफ सुरेश जाधव (२४, रा़ लक्ष्मणनगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक), दीपक दशरथ जाधव (३२, रा़ लक्ष्मणनगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक) व संदेश पगारे (रा़ पेठरोड, नाशिक) हे तिघे उगले यांच्याजवळ आले़ या संशयितांपैकी एकाने उगले यांच्या खिशात हात घालून दोन हजार सातशे रुपये बळजबरीने काढून घेतले़ या तिघांना उगले यांच्या चुलत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता उर्वरित दोघांनी हातात दगड घेऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी राजेंद्र उगले यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या तिघांनाही पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ (प्रतिनिधी)