पूरग्रस्तांसाठी ‘प्लॅटिनम ब्लॅँकेट चॅलेंज’

By Admin | Updated: September 17, 2014 01:41 IST2014-09-17T01:41:13+5:302014-09-17T01:41:38+5:30

पूरग्रस्तांसाठी ‘प्लॅटिनम ब्लॅँकेट चॅलेंज’

Platinum Blanket Challenge for flood victims | पूरग्रस्तांसाठी ‘प्लॅटिनम ब्लॅँकेट चॅलेंज’

पूरग्रस्तांसाठी ‘प्लॅटिनम ब्लॅँकेट चॅलेंज’

नाशिक : जगभरात गाजत असलेल्या ‘आइस बकेट चॅलेंज’च्या धर्तीवर येथील जेएसजी प्लॅटिनम ग्रुपच्या वतीने काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘प्लॅटिनम ब्लॅँकेट चॅलेंज ५०००’ हा आगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे पूरग्रस्तांसाठी तब्बल पाच हजार ब्लॅँकेट्स जमा केली जाणार आहेत.
काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्ते तथा बॉर्डरलेस फाउंडेशनचे संस्थापक अधिक कदम हे नाशिकमध्ये आले असता, त्यांच्याशी चर्चा करून जेएसजी ग्रुपने ही जबाबदारी स्वीकारली आहे. या अभियानाचा प्रारंभ आज खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर अशोक मुर्तडक, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या मान्यवरांनी हे आव्हान स्वीकारून या सामाजिक कार्यात मदतीचा हातभार लावला. या अभियानात सहभागी होण्यासाठी उपक्रमाचे मुख्य संकल्पक पारस लोहाडे, नितीन जांगडा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष कमलेश कोठारी, सतीश हिरण यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Platinum Blanket Challenge for flood victims