शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकबंदीचा उद्योगांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:28 IST

राज्य सरकारने पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिक, थर्माकोल व प्लॅस्टिकपासून तयार होणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया वस्तूंच्या वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातल्याने सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे १५० उद्योगांना फटका बसला आहे.

सातपूर : राज्य सरकारने पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिक, थर्माकोल व प्लॅस्टिकपासून तयार होणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया वस्तूंच्या वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातल्याने सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे १५० उद्योगांना फटका बसला आहे. या उद्योगांना पर्यायी उत्पादन शोधण्याची वेळ आली असून, त्यावर अवलंबून असलेल्या शेकडो कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे.  राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने तहकूब केल्यानंतर शनिवारपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. जिल्ह्यात जवळपास दीडशेहून अधिक प्लॅस्टिक उत्पादक आहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि तत्सम उत्पादने या उद्योगांना बंद करावी लागणार आहेत. अशा उद्योगांना प्लॅस्टिकबंदी निर्णयाचा चांगलाच फटका बसला आहे. या उद्योगांनी शनिवारपासून आपले उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे अशा कारखान्यांतील कामगारांवर कामगार कपातीचे संकट ओढवले आहे.  नाशिक जिल्ह्यात प्लॅस्टिकपासून चहाचे कप (प्लॅस्टिकपासून तयार होणारे व एकदाच वापरल्या जाणारे डिस्पोजेबल) बनविणारी एकच कंपनी असून, या कंपनीतील उत्पादन पूर्णपणे बंद करण्याबरोबरच उद्योग गुंडाळण्याची वेळ आली आहे. घातक प्लॅस्टिक उत्पादनाबाबत यापूर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी आणली आहे. या बंदीमुळे प्लॅस्टिक उत्पादक कारखान्यांनी आपले उत्पादन बंद केले आहे; मात्र काही कारखाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या उत्पादन करतात, अशा दीडशे कारखान्यांना उत्पादन बंद करावे लागणार आहे; मात्र हे कारखाने ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीचे उत्पादन घेऊ शकतात. ज्यांना ते शक्य नाही असे फक्त तीनच उद्योग आहेत. प्लॅस्टिकपासून तयार होणा-या व एकदाच वापरल्या जाणाºया डिस्पोजेबल वस्तू उत्पादन करणारे उद्योग नाशिकमध्ये नाहीत.  - मंगेश पाटणकर, अध्यक्ष निमा

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी