शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

गडावर प्लॅस्टिकबंदी

By admin | Updated: April 4, 2017 01:04 IST

सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गडावर प्लॅस्टिक आणू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी राधाकृष्णन बी़ यांनी केले आहे.

सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास रामनवमीपासून प्रारंभ होत असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गडावर प्लॅस्टिक आणू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी राधाकृष्णन बी़ यांनी केले आहे. मंगळवार, दि. ४ रोजी सकाळी ७ वाजता ट्रस्टच्या कार्यालयापासून सप्तशृंगीमातेच्या महावस्त्र व अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्हा न्यायाधीश अरुण ढवळे याच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात येणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष यू. एम. नंदेश्वर, ट्रस्टचे विश्वस्त शिंदे, जायभावे, गायधनी, भिडे, राजेन्द्र सूर्यवंशी, ट्रस्टचे विश्वस्त तथा कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे या महापूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.यात्रा कालावधीत भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी २४ तास मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात ध्वनिक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्हीचे ६५ कॅमेरे लावण्यात आले आहेत. नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, पहिल्या पायरीजवळ सहा मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तेल अर्पण करण्यासाठीही पहिल्या पायरीजवळ व्यवस्था करण्यात आली आहे. नारळ वाढविण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भाविकांनी येताना बरोबर प्लॅस्टिक कॅरीबॅग न आणण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मंदिराच्या साफसफाई, रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. भगवती मंदिर, सभामडंप, जाणाऱ्या व उतरणाऱ्या पायऱ्या, भक्त निवास, भक्तांगण, शिवालय तलाव परिसर येथे पुरेशी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास रोहित्राची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र वीज कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. सप्तशृंगगड येथे ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी, सहायक कर्मचारी कार्यरत राहणार असून, औषधसाठ्यासह ठिकठिकाणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.भाविकांना नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी परिवहन महामंडळातर्फे नेहमीप्रमाणे बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)