शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरवाडी : साठवणीचे पाणी प्यावे लागत असल्याचा परिणाम

By admin | Updated: March 21, 2015 00:01 IST

दूषित पाण्यामुळे आजारांमध्ये वाढ

सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना साठवणीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. सदर पाणी दूषित असल्याने गावात अनेक साथीचे आजार बळावल्याची तक्रार सरपंच कैलास काकड, ग्रामपंचायत सदस्य विजय गुरुळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.सलग तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने पिंपरवाडी (यशवंनगर) येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यासाठी गेल्या महिन्यातच प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्याप टॅँकर सुरू झालेला नाही. गेल्या आठवड्यापासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी साठवणुकीचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळेच ग्रामस्थ आजारी पडत असल्याचा आरोप सरपंच काकड यांनी केला आहे.गेल्या आठ दिवसापासून गावात काविळीची साथ सुरू झाल्याचे सरपंच काकड यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी व जुलाब आदि आजारही बळावल्याचे काकड यांचे म्हणणे आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात तक्रार केल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात येऊन पाहणी केली. गावातील पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. सदर साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी काकड यांनी केली आहे. (वार्ताहर)