दंडात्मक कारवाई, तरीही नागरिकांची दांडगाई

By Admin | Updated: April 9, 2017 00:22 IST2017-04-09T00:22:02+5:302017-04-09T00:22:38+5:30

नाशिक : महापालिकेने गोदाघाटावर वाहने-कपडे धुणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली असली तरी नागरिकांकडून दांडगाई सुरूच आहे.

Penal action, still the gunman's gunman | दंडात्मक कारवाई, तरीही नागरिकांची दांडगाई

दंडात्मक कारवाई, तरीही नागरिकांची दांडगाई

 नाशिक : महापालिकेने गेल्या पाच दिवसांपासून गोदाघाटावर घाण-कचरा करणाऱ्या तसेच वाहने-कपडे धुणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली असली तरी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याची दांडगाई सुरूच आहे. काही नागरिकांकडून सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालण्याचेही प्रकार घडत आहेत.
महापालिका आयुक्तांनी गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी गोदावरी कक्षाची स्थापना केली असून, त्यावर प्रमुख म्हणून उपआयुक्ताची नेमणूक केली आहे. गोदावरी कक्षामार्फत सध्या गोदाघाटावरील रामकुंड परिसराकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्यासाठी ४० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
गोदापात्रात घाण-कचरा तसेच कपडे-वाहने धुणाऱ्यांकडून महापालिकेमार्फत हजार रुपये दंड वसूल केला जात आहे. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत तीन जणांकडून दंडही वसूल केला आहे. तीन सत्रात सुरक्षारक्षक पहारा
ठेवत असले तरी काही नागरिकांची मात्र दांडगाई सुरूच आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Penal action, still the gunman's gunman