शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील पेलिकन पार्कच्या प्रश्नाने पुन्हा उगारला फणा

By admin | Updated: August 2, 2014 01:22 IST

नागपंचमीच्या आंदोलनाचे स्मरण : नितीन भोसले यांनी वेधले लक्ष

सिडको : गेल्या सात वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या पेलिकन पार्कच्या प्रश्नाकडे नागपंचमीच्या दिवशी आंदोलनाच्या माध्यमातून महापालिकेचे लक्ष वेधणाऱ्या आमदार नितीन भोसले यांनी यंदाही नागपंचमीचे औचित्य साधत पेलिकन पार्कची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेला साकडे घातले आहे. पेलिकन पार्कचा प्रस्ताव त्वरित येत्या महासभेवर ठेवण्याची मागणी करणारे पत्र भोसले यांनी महापौर व आयुक्तांना दिले आहे. मोरवाडी येथे महापालिकेच्या १७ एकर भूखंडावर उभारण्यात आलेला पेलिकन पार्कचा प्रश्न ठेकेदार आणि महापालिका यांच्यातील वादामुळे न्यायालयात गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे पार्कची अत्यंत दयनीय स्थिती झालेली असून, संपूर्ण पार्क झाडा-झुडपांनी वेढले गेले आहे. परिणामी, याठिकाणी सापांचा नेहमी वावर असतो. आजूबाजूच्या इमारतींमध्ये नेहमी साप निघत असल्याने रहिवाशांवर भीतीचे सावट असते. रात्रीच्या वेळी पार्कमध्ये अवैध धंद्यांनाही मोकळे रान उपलब्ध होते, तर गेल्या काही वर्षांत या पडीक जागेत दोन-तीन खुनाच्याही घटना घडलेल्या आहेत. पेलिकन पार्कचा तिढा लवकरात लवकर सुटावा आणि त्या जागेवर लोकोपयोगी कामे उभी राहावीत यासाठी आमदार नितीन भोसले गेल्या सात वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आले आहेत. पेलिकन पार्क हे एकप्रकारे सर्पोद्यानच बनल्याने नितीन भोसले यांनी दरवर्षी नागपंचमीला अभिनव आंदोलनाचा पवित्रा घेत या प्रश्नाकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मागील वर्षी न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला; परंतु सध्या संबंधित ठेकेदाराने न्यायालयाकडून याप्रश्नी स्थगिती आदेश मिळविला आहे. पेलिकन पार्क उभारणारी पूना अ‍ॅम्युझमेंट ही संस्था आणि महापालिका यांच्या वादात सिडकोवासीयांना मात्र नाहक संकटांचा सामना करावा लागतो आहे. यंदाही नागपंचमीचे औचित्य साधत नितीन भोसले यांनी पेलिकन पार्कच्या प्रश्नाकडे महापालिकेचे लक्ष वेधले आहे. संबंधित ठेकेदाराने महापालिकेची सदर जागा एका वित्तीय संस्थेकडे तारण ठेवली असून, त्यावर असलेला बोजा उतरविल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही. न्यायालयीन प्रक्रियेला लागणारा विलंब लक्षात घेता महापालिकेने संबंधित ठेकेदाराशी तडजोड करून पेलिकन पार्कचा प्रश्न त्वरित निकाली काढावा व तसा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवावा, अशी मागणी नितीन भोसले यांनी पत्राद्वारे केली आहे. (* वार्ताहर)