शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरले, पण घरकुल मिळेना!

By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST

महापालिकेचा कारभार : दलित पॅँथरने केली मुख्यालयासमोर निदर्शने

नाशिक : महापालिकेच्या घरकुल योजनेसाठी लाभपात्र व्यक्तींकडून त्यांच्या हिश्श्याची रक्कम घेण्यात आली; परंतु त्यांना अद्याप घरकुलांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे वंचित लाभपात्र व्यक्तींनी गुरुवारी दलित पॅँथरच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर निदर्शने केली. येत्या दोन- तीन दिवसांत अपूर्ण घरकुले पूर्ण करून त्याचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी महापालिकेने दिले.पंचवटी विभागातील सावित्रीबाई फुलेनगर, वीटभट्टी, गणेशवाडी, अंबिकानगर, आरटीओ आॅफिससमोर येथील झोपडपट्टीवासीयांना घरकुले मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्नकेले.महापालिकेने त्यांचे पुरावे बघून त्यांना घरे देण्यास अनुकूलता दर्शविली. त्यानंतर पालिकेने त्यांच्याकडून १४ हजार २२२, तर काही वर्गाकडून १७ हजार ६०० रुपये याप्रमाणे लाभपात्र व्यक्तींचा हिस्सा घेण्यात आला आणि रीतसर पावत्या देण्यात आल्या. त्यानंतर निलगिरी बाग येथे घरकुल देण्याचे ठरविण्यात आले आणि सोडतही काढण्यात आली. परंतु चार महिने उलटून गेले तरी घरकुले देण्यात आलेली नाही. अशा प्रकारचे सुमारे ८० ते ९० लाभपात्र कुटुंबे असल्याचे सांगण्यात येते. सध्या ही कुटुंबे ज्या भागात राहतात तेथे पावसाचे पाणी साचले असून, त्यांना राहता येणे अशक्य झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने घरे मिळावी यासाठी दलित पॅँथरने निदर्शने केली. त्यानंतर सुरेश नेटावटे, विजय साळवे, रमेश नाईक, शिवाजी खरात, प्रशांत नाईक, रमेश आव्हाड, गोपाल यादव, लक्ष्मण खरात, हरिदास भालेराव यांनी उपआयुक्त रोहिदास बहिरम यांना निवेदन दिले. निलगिरी बाग येथील घरकुले त्वरित पूर्ण करून लवकरच ती वितरित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)