शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात नाशिकच्या उत्तम स्वामी यांचा पट्टाभिषेक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 00:21 IST

नाशिक : ध्यानयोगी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले उत्तम स्वामीजी पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर बनले आहेत. सर्व आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीत उत्तम स्वामीजी यांचा हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सनातनधर्म पद्धतीने पट्टाभिषेक करण्यात आला.

ठळक मुद्देपंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर : पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

नाशिक : ध्यानयोगी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले उत्तम स्वामीजी पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर बनले आहेत. सर्व आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीत उत्तम स्वामीजी यांचा हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सनातनधर्म पद्धतीने पट्टाभिषेक करण्यात आला.हरिद्वार येथे सध्या कुंभमेळा सुरू आहे. सर्व प्रमुख १३ आखाड्यांचे भारतभरातील प्रमुख आचार्य महामंडलेश्वर, श्री महंत व महंत हरिद्वार येथे जमले आहेत. आतापर्यंत कोणत्याही आखाड्याशी संबंधित नसलेले मूळचे महाराष्ट्रातील, पण सध्या राजस्थानमधील बासवाडा येथे वास्तव्य असलेले ध्यानयोगी उत्तम स्वामीजी यांचा भारतभर व विदेशातही भक्त परिवार आहे.बासवाडासह हरिद्वार, उज्जैन, सलकनपूर, लोहगाव, मंदसौर येथे त्यांचे आश्रम आहेत. त्या माध्यमातून अनाथांसाठी शाळा, आरोग्यसेवा, अन्नदान आदी अनेक सेवाकार्य चालवले जातात.हरिद्वार येथील पट्टाभिषेक सोहळ्यास पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर रामकृष्णानंद, सभापती महंत मुक्तानंद ब्रम्हचारी महाराज, महामंत्री महंत सोमेश्वरानंद महाराज, आचार्य महामंडलेश्वर ब्रह्मर्षी रामकृष्णानंद, सचिव संपूर्णानंद महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, महामंडलेश्वर मॉ कनकेश्वरी देवी, द्वारिका सनातनी सेवामंडलाचे केशवानंद महाराज, रामजन्मभूमी न्यासाचे सचिव चंपकराय, मुक्तानंद यांच्यासह १३ आखाड्यांचे प्रमुख साधुमहंत यांच्यासह भक्तपरिवार उपस्थित होता. रामबाबा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.महामंडलेश्वर ईश्वरानंदध्यानयोगी स्वामी उत्तम स्वामीजी यांना पंचअग्नी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर झाल्याने त्यांना आता महामंडलेश्वर ईश्वरानंद म्हणून ओळखले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गुरुभक्त मंडळाचे अध्यक्ष संजय नागरे यांनी दिली. 

टॅग्स :haridwar-pcहरिद्वारSocialसामाजिक