शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

अर्धवट बांधकामाचा स्लॅब कोसळून नाशिकमध्ये तीघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 10:36 PM

वादळी वाऱ्यासह गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरामध्ये अवघ्या तासाभरात ३६ मि.मी इतका पाऊस पडला.

ठळक मुद्देसुदैवाने तीघांचे प्राण वाचले. तीघा जखमींना मलब्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यास यश आले

नाशिक : गुरूवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने पंचवटीमधील फुलेनगर परिसरातील एका अर्धवट स्थितीतील बांधकाम असलेल्या घराचा स्लॅब कोसळून तीघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. स्लॅबच्या मलब्याखाली अडकलेल्या तीघा पुरूषांना अग्निशामक दलाचे जवान व पोलिसांनी आपत्कालीन मदतकार्य करुन रेस्क्यू केले. सुदैवाने तीघांचे प्राण वाचले.वादळी वाऱ्यासह गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरामध्ये अवघ्या तासाभरात ३६ मि.मी इतका पाऊस पडला. दरम्यान, फुलेनगरमधील एका अर्धवट स्थितीत असलेल्या घराचे बांधकामामध्ये दोन भींतींच्या आधारे टाकण्यात आलेला स्लॅब वादळी वारा व पावसाने कोसळला. हे घर संगीता गोपाळ गायकवाड यांच्या मालकीचे असून अर्धवट बांधकामाचा आधार घेत फुलेनगरमधील शनिचौकात या घरामध्ये श्याम (पुर्ण नाव नाही समजले नाही) सोमनाथ भवर (४०) सुरेश नारायण जाधव (२८) हे मोलमजूरी करणारे कामगार आश्रयाला होते. दरम्यान, ते बसलेले असताना अचानकपणे पावसामुळे वरील स्लॅब कोसळला आणि स्लॅबच्या मलब्याखाली तीघे अडकले. दैव बलवत्तर असल्यामुळे तीघांचे या दुर्घटनेत प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तोपर्यंत परिसरातील बघ्यांच्या गर्दीचा मोठा जमाव घटनास्थळी जमलेला होता. पंचवटी अग्निशामक उपकेंद्राचे जवान घटनास्थळी पोहचले. इलेक्ट्रॉनिक कटर, स्पॅनरच्या सहाय्याने लिडिंग फायरमन विलास डांगळे, उमेश झिटे, महेंद्र सोनवणे, सोमनाथ पगार, संतोष भालेराव आदिंनी ढिगारा हटविला. दरम्यान, काही पोलिसांनीही जवानांना आपत्कालीन कार्यात मदत केली. जलद प्रतिसाद पथकाची तुकडीला गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना मदतकार्य करताना अडथळा आला नाही. तत्काळ तीघा जखमींना मलब्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यास यश आले. दोघे बेशुध्दावस्थेत होते. रुग्णवाहिकेतून तीघांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोेंद करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकAccidentअपघात