पेठ पोलीस ठाण्यातर्फे प्रभात फेरी

By Admin | Updated: January 3, 2017 23:19 IST2017-01-03T23:19:13+5:302017-01-03T23:19:36+5:30

पेठ पोलीस ठाण्यातर्फे प्रभात फेरी

Parthak Pariya Pethi Pethi by Peth Police Station | पेठ पोलीस ठाण्यातर्फे प्रभात फेरी

पेठ पोलीस ठाण्यातर्फे प्रभात फेरी

पेठ : येथील पोलीस ठाण्याच्या वतीनेरेझिंग डे साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थी व ग्रामस्थांनी शहरातून प्रभात फेरी काढली.
तहसीलदार हरिश भामरे, पोलीस निरीक्षक विजय सोनवणे, नगराध्यक्ष लता सातपुते यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. येथील जनता विद्यालयातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे बाराशे विद्यार्थ्यांची फेरीत सहभाग घेतला. फेरीत रस्ते सुरक्षा याविषयी घोषणा देत जनजागृती करण्यात आली. यानंतर पोलीस निरीक्षक विजय सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुंडे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील हत्यारे दाखवून त्याविषयी माहिती दिली. यावेळी तहसीलदार हरिश भामरे, नगराध्यक्ष लताबाई सातपुते, नगरसेवक कुमार मोंढे, चेतन निखळ,  प्रकाश धुळे, प्रतिभा पाटील, भाग्यश्री सिरसाठ, सुनीता चौधरी, प्राचार्य ए. एम. बागुल, पी. पी. जाधव, के. एन. खरे, एन. आर. शिंदे यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, पोलीस कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)







 

Web Title: Parthak Pariya Pethi Pethi by Peth Police Station